रविवारी (17 नोव्हेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडीज महिला संघातील 5 टी20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गयाना येथे पार पडला. हा सामना भारतीय महिला संघाने 5 धावांनी जिंकला. त्याचबरोबर या मालिकेत 4-0 ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात वेस्ट इंडीजची कर्णधार अनिसा मोहम्मदने नाणेफेक जिंकला आणि वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण सामना पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 9 षटकांचाच करण्यात आला.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजला 51 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाकडून हेले मॅथ्यूज आणि चिनेले हेन्री यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. तर, नताशा मॅकलिन (10), शिमेन कँपबेल नाबाद (5) धावांची खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करता आली नाही.
त्यामुळे वेस्ट इंडीजचा डाव 9 षटकात 5 बाद 45 धावांवर संपला आणि भारताने 5 धावांनी विजय मिळवला.
भारताकडून गोलंदाजी करताना अनुजा पाटीलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच दीप्ती शर्मा आणि राधा यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी भारतीय संघाकडून फलंदाजी करताना पुजा वस्त्रकारने सर्वाधिक 10 धावा केल्या. तर, तानिया भाटियाने नाबाद (8) आणि शेफाली वर्माने (7) धावा केल्या. पण इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. भारताकडून केवळ पुजाने दोन आकडी धावसंख्या पार केली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 50 धावा करता आल्या.
विंडीजकडून गोलंदाजी करताना हेले मॅथ्यूजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, ऍफी फ्लेचर आणि शेनीता ग्रिमाँडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
आता भारत आणि वेस्ट इंडीजमधील पाचवा आणि अंतिम टी -२० सामना बुधवारी गयाना येथील प्रोव्हिडन्समधील राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
व्हिडिओ: '2 रुपये की पेप्सी, रहीम भाई सेक्सी' म्हणत चाहत्यांनी मुशफिकुर रहीमला पिडले
वाचा👉https://t.co/eu8F2o0MV0👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket #INDvBAN— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019
बंदीनंतर पृथ्वी शॉचे झाले धडाक्यात पुनरागमन, पण तरीही झाला चाहत्यांकडून ट्रोल
वाचा👉https://t.co/BXMm6Zj4fT👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket #prithvishaw— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019