---Advertisement---

…म्हणून मयंक अगरवालला वनडे, टी२० खेळण्यासाठी करावी लागणार प्रतिक्षा

On: सोमवार, नोव्हेंबर 18, 2019 4:42 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला.

या विजयात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने(Mayank Agarwal)द्विशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.

मयंक अगरवालने  द्विशतकी खेळी करताना 243 धावा केल्या. त्यात 8 षटकार आणि 28 चौकारांचा समावेश होता. परंतु, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की मयंकला वनडे किंवा टी20 सारख्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये खेळण्यासाठी संघात स्थान मिळणे कठीण आहे.

भारत आता डिसेंबरमध्ये विंडीज (West Indies) विरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. मालिकेचा पहिला सामना 6 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर मुंबईत होईल.

याबद्दल बोलताना सुत्राने सांगितले की ‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला कोठे जागा आहे? रोहित शर्मा आणि शिखर धवन हे सलामीवीर आहेत. वरच्या फळीत केएल राहुल आहे आणि विराट कोहलीही विंडीजविरुद्धच्या मालिकेतून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.’

त्याचबरोबर सुत्राने असेही सांगितले की मयंकला तेव्हाच संधी मिळू शकते जेव्हा रोहित किंवा शिखर या दोघांपैकी कोणीतरी विश्रांती घेईल.

मयंत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मयंकने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑक्टोबरमध्ये विशाखापट्टणम कसोटीमध्ये 215 धावा केल्या होत्या. हे त्याचे कसोटीतील पहिले द्विशतक होते. यानंतर, पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात मयंकने 108 धावा केल्या होत्या.

बांगलादेश विरुद्ध नुकताच संपलेला पहिला कसोटी सामना हा मयंकचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा आठवा कसोटी सामना होता. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 8 कसोटी सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना अनुक्रमे 76, 77, 5, 55, 215, 108, 10 आणि 243 अशा धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---