भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना नागपूर येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ असल्याचे दिसत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एखादा खेळाडू सोडला, तर भारताच्या जवळपास अर्ध्या संघाने विक्रमांचे मनोरे रचलेत. त्यात आर अश्विन या अनुभवी गोलंदाजाचाही समावेश आहे. अश्विनने पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि खास विक्रम नावावर केला.
भारतीय संघाकडून या सामन्यात गोलंदाजी करताना आर अश्विन (R Ashwin) याने पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. या 5 पैकी चार विकेट्स त्याने फलंदाजांना पायचीत (एलबीडब्ल्यू) करत घेतल्या. त्यामध्ये डेविड वॉर्नर (10), मॅट रेनशॉ (2), पीटर हँड्सकाँब (6) आणि ऍलेक्स कॅरे (10) यांचा समावेश होता. या चार खेळाडूंना पायचीत बाद करताच अश्विनने पायचीत बाद करून कसोटीत 100 विकेट्स नावावर केल्या. यामुळे त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
https://twitter.com/BCCI/status/1624319411044904961
अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट्स या पायचीत बाद करत घेणारा पाचवा फिरकीपटू ठरला. या यादीत अव्वलस्थानी भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) आहे. त्याने आतापर्यंत कसोटीत 156 विकेट्स या पायतीच बाद करून घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) आहे. त्याने कसोटीत 150 विकेट्स पायचीत बाद करून घेतल्या आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) आहे. त्याने कसोटीत 138 विकेट्स या फलंदाजांना एलबीडब्ल्यू करून घेतल्या आहेत. यादीत चौथ्या स्थानीदेखील श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेरथ आहे. त्याने 108 कसोटी विकेट्स या पायचीतरीत्या बाद करत घेतल्या आहेत. (Spinners to pick 100 wickets through LBW in Tests)
कसोटीत पायचीत करत 100 विकेट्स घेणारे फिरकीपटू
156 विकेट्स- अनिल कुंबळे (भारत)
150 विकेट्स- मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
138 विकेट्स- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
108 विकेट्स- रंगना हेरथ (श्रीलंका)
100 विकेट्स- आर अश्विन (भारत)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांना सतावणाऱ्या मर्फीचा शमीने उठवला बाजार, गुडघ्यावर बसून भिरकावला गगनचुंबी षटकार; व्हिडिओ पाहाच
नागपूरमध्ये भारताचे पारडे जड! कसोटीच्या पहिल्या डावात घेतली तब्बल ‘इतक्या’ धावांची आघाडी






