सध्या इंग्लंडमध्ये उन्हाळा सुरु आहे.त्यामुळे तेथील तापमान ३४ डीग्रीवर पोहचले आहे.
या कारणामुळे मेरीलेबोन क्रिकेट क्लबने कित्येक वर्षांची, प्रेक्षकांच्या गणवेशाची परंपरा स्थगित केली आहे.
एमसीसीच्या नियमानुसार एमसीसीचे सदस्य असलेले प्रेक्षक जेव्हा संघाचे सामने पहायला येतात तेव्हा टॉय, कोट आणि बुट घालुन येणे बंधनकारक होते.
मात्र इंग्लंडमधील उष्ण वातावरण लक्षात घेउन एमसीसीने सदस्य प्रेक्षकांसाठी असलेला गणवेशाचा नियम तात्पुरता शिथिल केला आहे.
याची माहिती लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या अधिकृत ट्विटर आकाउंटवरुन गुरुवारी (२६ जुलै) रोजी देण्यात आली.
Due to the abnormally warm temperatures, MCC has decided to dispense with requirement for gentlemen to wear jackets in the Pavilion and arrive wearing one.
This applies to Members of MCC and Middlesex and their guests. pic.twitter.com/KP07HK1eSl
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) July 26, 2018
या घोषणेनंतर लॉर्ड्सवर गुरुवारी (२६ जुलै) हॅम्पशायर विरुद्ध मिडलसेक्स यांच्यात टी-२० ब्लास्ट स्पर्धेत झालेल्या सामन्यात प्रेक्षक कोट न घालता सामना पाहतानाचा फोटो, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला होता.
👔 With the London heatwave in full-effect, a jacket-less Pavilion watches on.#LoveLords pic.twitter.com/NdlduRLP2i
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) July 26, 2018
यापूर्वी इंग्लंडमधील उष्ण वातावरणामुळे भारत विरुद्ध एसेक्स यांच्यात २५ ते २७ जुलै दरम्यान झालेला चार दिवसीय सराव सामनाही तीन दिवसांचा करण्यात आला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–“कैसे ना हो गुजारा, जब साथ हो कोहली और पुजारा” गब्बरच्या ट्विटने जिंकली लाखो चाहत्यांची मने
-सराव सामन्यात विराटची बत्ती गुल करणार गोलंदाज तो व्हिडीओ करणार जतन