भारताची स्टार फलंदाज स्म्रीती मानधनाने बिग बॅश लीगनंतर इंग्लंडमधील किया सुपर लीगमध्ये धमाकेदार आगमन केले आहे.
वेस्टर्न स्टॉर्म संघाकडून रविवारी (22 जुलै) किया सुपर लीगमधील आपला पहिला सामना खेळत असलेल्या स्म्रीतीने 20 चेंडूत 48 धावांची तुफानी खेळी करत आपल्या संघाला यॉर्कशायर डायमंड विरुद्ध विजय मिळवून दिला.
या सामन्यात तुफान फलंदाजी करणाऱ्या स्म्रीतीने समालोचनातही आपली जादू दाखवली.
याची माहिती स्म्रीतीच्या एका चाहत्याने ट्विटरवरुन दिली.
https://twitter.com/smriti18fc/status/1021179215327064064
स्म्रीतीने 20 चेंडूत 48 धावांची खेळी करुन बाद झाल्यानंतर, इंग्लंडची माजी क्रिकेटपटू इशा गुहासोबत या सामन्याचे समालोचन केले. स्म्रीतीच्या या कृतीने, ती क्रिकेटचा पूर्णपणे आनंद घेत असल्याचे दाखवून दिले.
स्म्रीतीने 2013 साली भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. गेल्या दोन वर्षापासून तीने आंतराष्ट्रीय स्तरावर दमदार प्रदर्शन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-जेम्स अॅंडरसनचा कर्णधार विराट कोहलीवर आरोप
-टीम इंडियाला मोठा धक्का! हा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर?