बंगाल रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार मनोज तिवारीची ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलिया अ आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या चौरंगी मालिकेसाठी भारतीय अ किंवा ब संघात निवड झाली नाही.
मनोज तिवारीने 2017-18 च्या विजय हजारे चषकात 109.33 च्या सरासरीने 328 धावा केल्या आहेत. तर देवदधर चषकात दोन सामन्यात 179 च्या सरासरीने 179 धावा करत दमदार प्रदर्शन केले होते.
या दोेन्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करुनही भारतीय अ किंवा ब संघात निवड न झाल्याने, निराश झालेल्या मनोज तिवारीने भारतीय निवड समितीवर ट्विटरवरुन जोरदार टीका करत ट्रोल केले.
2017-18 च्या विजय हजारे आणि देवधर चषकात 100 पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा करणारा एकमेव फलंदाज होता.
याचाच आधार घेत मनोज तिवारीने भारतातील प्रसिद्ध क्रिकेट स्टॅटेस्टीयन मोहनदास मेनन यांना ट्विटमध्ये टॅग करत विचारले की, 2017-18 च्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो सोडून 100 पेक्षा जास्तीच्या सरासरीने कोणी धावा केल्या आहेत का?
Gudmrg @mohanstatsman G. Awaiting ur reply. I know I’m one of them but want to know how many others are there ??
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) July 24, 2018
त्यानंतर मोहनदास मेनन यांनी मनोज तिवारीच्या ट्विटला उत्तर देत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका मोसमात 100 पेक्षा जास्त सरासरीने धावा करणाऱ्यांची यादी दिली.
Could not locate any other instance. But this could interest u..
High batg ave in List A domestic season
(min 400 runs)
126.75 M Tiwary (Ben,IndB) 507runs 2017/18
114.40 M Manhas (Del,NZo) 572r 2005/06
110.50 I Jaggi (Jhar,EZo) 442r 2008/09
109.75 VKambli (Mum,WZo) 439r 2001/02— Mohandas Menon (@mohanstatsman) July 24, 2018
मोहनदास मेनन यांनी दिलेल्या यादीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2017-18 च्या मोसमात 100 पेक्षा जास्त, 126.75 सरासरीने मनोज तिवारीने धावा केल्याचे नाव होते.
Thank u so much Mohan G for ur reply. It feels gud to know about it. I really admire your work. Hope to see you in person soon. Thank u once again. Hav a great day ahead 😊
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) July 24, 2018
त्यानंतर मोहनदास मेनन यांनी दिलेल्या उत्तराचे आभार मानत मनोजने निवड समितीचे नाव न घेता टिका केली.
भारत अ, भारत ब, दक्षिण आफ्रिका अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील चौरंगी मालिकेला 17 ऑगस्टला सुरवात होणार आहे.
भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ यांच्यात पहिला कसोटी सामना 2 ते 5 सप्टेंबर तर दुसरा कसोटी सामना 8 ते 11 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-यु मुंबा आता मुंबापुरीच्या बाहेर! महाराष्ट्रातील हे शहर होणार नवे होम ग्राऊंड!
-दिग्गज फलंदाज म्हणतो, विराट भारीच; इंग्लंडमध्ये कसाही खेळला तरीही काही फरक पडत नाही