भारत-इंग्लंड यांच्या मध्ये एक ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे.
या मिलिकेतील बर्मिंघहम येथील पहिल्या सामन्यात इंग्लंड जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोच्च विक्रम प्रस्थापित करणार आहे.
हा सामना इंग्लंडसाठी १००० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना ठरणार आहे.
याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर १००० वा कसोटी सामना खेळणारा इंग्लंड पहिला देश ठरेल.
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये १८७७ मध्ये पहिला कसोटी सामना झाला होता.
यामध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलियाला मागे टाकत १००० वा कसोटी सामना खेळण्याचा मान प्रथम मिळवणार आहे.
इंग्लंड नंतर सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा मान ऑस्ट्रेलियाकडे आहे.
ऑस्ट्रेलियाने १८७७ ते जुलै २०१८ या काळात ८१२ कसोटी सामने खेळले आहेत.
यामध्ये सर्वाधिक कसोटी सामने इंग्लंड खेळला असला तरी सर्वाधिक कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात ऑस्ट्रेलिया अव्वल आहे.
ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या ८१२ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ३८३ सामन्यात विजय प्राप्त केले आहेत.
त्यानंतर इंग्लंडने ३५७ कसोटी सामने जिंकले आहेत.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया नंतर सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत वेस्ट इंडिजचा तिसरा क्रमांक लागतो. वेस्ट इंडिजने आजपर्यंत ५३५ कसोटी सामने खेळले आहेत.
तर सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या यादीत भारतीय संघ चौथ्या स्थानी आहे. भारताच्या नावावर १९३२ ते २०१८ या काळात ५२२ कसोटी सामने आहेत. या काळात भारत सरासरी ६ सामने प्रत्येक वर्षी खेळला आहे.
तर भारत गेल्या १० वर्षात १०३ सामने खेळला आहे. यामुळे ही सरासरी प्रत्येक वर्षी अंदाजे १०सामन्यांची आहे. त्यामुळे १००० कसोटी सामने खेळण्यासाठी भारताला नक्कीच मोठा काळ लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–मला आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडलं असतं – राहुल द्रविड
–एमएस धोनी आणि धडक फेम इशान खट्टर झाले फुटबॉल सामन्यात सैराट