भारत-इंग्लड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला चार दिवस राहीले आहेत.
त्यापूर्वी इंग्लंडचे गोलंदाजीचे माजी प्रशिक्षक ट्रॉय कूली यांनी स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अॅंडरसन यांच्या या कसोटी मालिकेतील कामगिरी विषयी मोठे वक्तव्य केले आहे.
“या मालिकेत ब्रॉड-अँडरसन जोडी भारतीय फलंदाजांसाठी नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे. ज्यावेळी खेळपट्टी कोरडी असते, त्यावेळी रिव्हर्स स्विंगला जास्त वाव असतो आणि इंग्लिश गोलंदाज इंग्लंडमध्ये रिव्हर्स स्विंगमध्ये माहीर आहेत.” असे ट्रॉय कूली म्हणाले.
त्याचबरोबर ट्रॉय कूली यांनी भारताविरुद्धची ही कसोटी मालिका स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अॅंडरसनसाठी लिटमस टेस्ट असणार आहे असे मत व्यक्त केले आहे.
“यावेळी इंग्लंडमधील परिस्थिती थोडीशी कठीण असणार आहे. तसेच कोरड्या खेळपट्टीचे ब्रॉड-अँडरसन समोर कठीण आव्हान असणार आहे. त्यांना रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न आणि वेगवान गोलंदाजी करावी लागणार आहे. ही कसोटी मालिका खऱ्या अर्थाने यांच्यासाठी कठीण परीक्षा असणार आहे.
येत्या बुधवारपासून (1 ऑगस्ट) भारत इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात होत आहे.
या मालिकेतल पहिला सामना बर्मिंघहम यथे होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-मार्टिन गप्टीलने केला टी२० मधील मोठा कारनामा
–“कैसे ना हो गुजारा, जब साथ हो कोहली और पुजारा” गब्बरच्या ट्विटने जिंकली लाखो चाहत्यांची मने