---Advertisement---

खेळाडूंबद्दलची ही लाजिरवाणी गोष्ट टाळण्यासाठी बीसीसीआयचा महत्वपूर्ण निर्णय!

On: मंगळवार, जून 19, 2018 4:23 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बीसीसीआयचे कार्यकारी व्यवस्थापक साबा करीम, व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थीतीत यो-यो टेस्ट बाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापुढे प्रत्येक मालिकेच्या संघ निवडी पूर्वीच यो-यो टेस्ट घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.

अफगानिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी यो-यो टेस्टपूर्वीच संघ निवड झाली होती.

पण त्यानंतर झालेल्या यो-यो टेस्टमध्ये मोहम्मद शमी अफगानिस्तान सामन्यासाठी झालेल्या यो-यो टेस्ट मध्ये फेल झाल्यामुळे ऐनवेळी नवदिप सैनीची निवड झाली होती.

तर भारतीय अ संघात निवड झालेल्या संजू सॅमसनही यो-यो टेस्टमध्ये फेल झाला होता.

त्याचबरोबर इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेला अंबाती रायडूही यो-यो टेस्ट फेल झाल्यामुळे त्याच्या जागी रैनाचा समावेश करावा लागला आहे.

ऐनवेळी हा बदली खेळाडूचा गोंधळ टाळण्यासाठी इथून पुढे संघ निवडीपूर्वीच यो-यो टेस्ट घेण्यात येणार आहे.

महात्वाच्या बातम्या-

तब्बल ३ वर्षांनी हा खेळाडू करतोय भारतीय संघात पुनरागमन!

स्मिथ-वार्नरपाठोपाठ आणखी एक मोठा क्रिकेटपटू बॉल टॅम्परींगच्या जाळ्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment