भारत-इंग्लंड यांच्यात एक ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरवात होत आहे.
यापूर्वी बुधवारपासून (२५ जुलै) भारताचा एसेक्स कौंटी संघाविरुद्ध केम्सफोर्ड येथील कौंटी क्रिकेट मैदानावर चार दिवसीय सराव सामना होणार होता.
मात्र कौंटी क्रिकेट मैदानावरील खराब पिच आणि आउटफिल्डमुळे भारतीय संघाने या सामन्याचा चौथा दिवस रद्द करत, हा सामना तीन दिवसच खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी दुपारी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुन यांनी पिच आणि मैदानाची पहाणी केल्यानंतर हा निर्णय घेतला.
कौंटी क्रिकट मैदानावरील खराब आउटफिल्डमुळे खेळाडुंना दुखापत होण्याची शक्यता लक्षात घेउन हा निर्णय घेतल्याचे भारतीय संघ व्यवस्थापनाने सांगितले.
या मैदानावरील सराव सामन्याच्या पिचवर अधिक गवत ठेवले आहे, तर प्रॅक्टीस पिचवर काहीच गवत ठेवले नसल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाने कौंटी क्रिकेट मैदानाच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारत-पाकिस्तान पुन्हा आमने सामने, एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर
-रोनाल्डोचा फिटनेस वीस वर्षाच्या तरूण फुटबॉलपटूसारखा