‘आज की आदालत’ फेम पत्रकार रजत शर्मा यांची दिल्ली आणि डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी 54.40 टक्के मतांनी निवड झाली.
डीडीसीएच्या 27 आणि 30 जूनला झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवार, 2 जूलै रोजी जाहीर करण्यात आला.
यामध्ये रजत शर्मा 54.40 टक्के मते घेऊन अध्यक्षपदी तर 47.87 टक्के मते मिळवत राकेश कुमार बंन्सल उपाध्यक्षपदी निवडून आले.
या निवडीनंतर रजत शर्मा यांनी डीडीसीएच्या सदस्यांचे ट्विट करून आभार मानले.
“माझ्यावर विश्वास ठेऊन मला मतदान केलेल्या डीडीसीएच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो. आता आपण डीडीसीएचे सर्व सदस्य मिळून पारदर्शकपणे डीडीसीएचा कारभार चालवू.” ़डीडीसीएचे नवनियुक्त अध्यक्ष रजत शर्मा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
https://twitter.com/RajatSharmaLive/status/1013681135245672449?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1013681135245672449&ref_url=https%3A%2F%2Findianexpress.com%2Farticle%2Fsports%2Fcricket%2Fjournalist-rajat-sharma-appointed-as-ddca-president-5242324%2F
पद्मभूषण पुरस्कार विजेते रदत शर्मा इंडिया टीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीचे चेअरमन आणि मुख्य संपादक आहे.
तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा ज्या राज्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो त्या राज्याचे ते आता नेतृत्व करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे रौप्यपदक; पेनल्टी शुटआऊटमध्ये आॅस्ट्रेलियाने मारली…
-फिफा विश्वचषक: डेन्मार्कला धूळ चारत क्रोएशियाचा उपांत्य…