---Advertisement---

हरमनप्रीत कौरचे पोलिस उपअधिक्षकपद गेले, अर्जून पुरस्कारही जाणार?

On: मंगळवार, जुलै 10, 2018 10:05 AM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेटपटू  हरमनप्रीत कौरचे पोलीस उपअधीक्षक पद पंजाब सरकारने अखेर काढून घेतले आहे.

2017 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतची तीच्या या कामगिरीसाठी पंजाब सरकारने पोलिस उपअधीक्षक पदी निवड केली होती.

मात्र उपअधीक्षक पदासाठी पंजाब पोलिसांकडून हरमनप्रीतच्या पदवी प्रमाणपत्राची पाडताळणी करताना हरमनप्रीतने पंजाब पोलिसांसमोर बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले होते.

तीच्याकडे पदवी प्रमाणपत्र नसल्याने ती आता पोलीस उपअधीक्षक पदासाठी पात्र नाही. मात्र बारावी पास या निकषानुसार हरमनप्रीतला पोलीस कॉन्स्टेबलचे पद मिळू शकते.

या प्रकरणामुळे आता हरमनप्रीत कौरचा अर्जुन पुरस्कारही धोक्यात आला आहे. जर पंजाब पोलीसांनी हरमनप्रीत विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्यास तीला मिळालेला अर्जुन पुरस्कार केंद्र सरकार काढून घेऊ शकते.

हरमनप्रीत कौरच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने हरमनप्रीत कौरला २०१७ साली अर्जुन पुरस्कार देऊन गौरविले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-फिफा विश्वचषकातील आज होणाऱ्या फ्रान्स विरूद्ध बेल्जियम सामन्याबद्दल सर्वकाही

-आयसीसी टी२० क्रमवारीच्या टाॅप १० मध्ये केवळ एक भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment