पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीचे उल्लंघन जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचे खेळ खेळले जाणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केले आहे.
विजय गोयल यांचे हे वक्तव्य तेव्हा आले जेव्हा भारतीय दूतावासाने पाकिस्तानी मल्लांना भारतात होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिपसाठी व्हिसा नाकारला. आशियाई चॅम्पियनशिप येत्या १० ते १४ मे रोजी भारतात होणार आहे.
“पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीचे उल्लंघन जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचे खेळ खेळले जाणार नाही. भारत आणि पाकिस्तानचे संबंध तेव्हाच सुधारू शकतात जेव्हा पाकिस्तान सीमेपलीकडून होणार दहशतवाद पोसणे थांबवेल. ” गोयल यांनी हे वक्तव्य राष्ट्रीय युवक पुरस्कार जाहीर केल्यांनंतर पत्रकारांशी बोलताना केले.
Terrorism & sports cannot go together; it is in my cognizance: Union Sports Minister Vijay Goel on denial of visas to Pakistani wrestlers pic.twitter.com/1LkfDyhEXR
— ANI (@ANI) May 3, 2017
गोयल पुढे म्हणाले, ” आम्ही ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. आमच्या ह्या निर्णयामुळे पाकिस्तानमधील जनता तेथील सरकारवर दबाव वाढवेल. जेणेकरून पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करेल. संपूर्ण जगाला माहित आहे कि पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवाद पोसतो.”
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान स्कॉश फेडेरेशननेही हाच मुद्दा उचलून धरला होता.