१८ ऑगस्टपासून जकार्तामध्ये सुरू होणाऱ्या एशियन गेम्समध्ये भारताच्या फुटबॉल संघांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय ऑलिंपिक संघटनेची(आयओए) याबाबत चर्चा झाली त्यात नवीन नियमानुसार, मागील सहा महिन्यांपासून केलेल्या कामगिरीवरून संघांची निवड केली जाणार आहे. यामुळे फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल या संघाना थोडा धीर मिळाला आहे.
जुनी निवड प्रक्रिया ही मागच्या एशियन गेम्समधील संघाच्या स्थानावरून आणि पूर्ण वर्षांतील कामगिरी लक्षात घेऊन ठरवली जात होती.
भारतीय खेळाचे अधिकारी राहूल भटनागर यांनी हा निर्णय भारतीय फुटबॉल संघ सध्या करत असलेल्या कामगिरीवरून घेतला आहे.
“आधी घेतलेल्या निर्णयांवर विचार करणे आवश्यक होते. कारण ज्याप्रकारे भारतीय तरूण खेळाडू खेळांमध्ये प्रगती करत आहे त्यासाठी हा निर्णय बरोबर आहे. तसेच भारत या स्पर्धेत पदके जिंकू शकतो”, असे भटनागर म्हणाले.
भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरींदर बात्रा यांनी भारतीय फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई केली होती. त्यांच्या या निर्णयावरून ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने (एआयएफएफ) नाराजी दर्शवली होती.
आयओए 524 खेळाडूंचा चमू एशियन गेम्ससाठी पाठवणार, अशी घोषणा केली आहे. यातच आयओएने आणखी एका खेळाच्या संघाला वगळले आहे. यात हॅण्डबॉल खेळणाऱ्या 20 जणांचा समावेश आहे. तसेच यात आणखीही काही बदल होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषक: एमबाप्पेने केलेल्या त्या गोलची ट्विटरवर सर्वाधिक चर्चा
–एमबाप्पेने फिफा विश्वचषकात मिळालेल्या बक्षिसाची सर्व रक्कम केली दान