फिनलॅंड येथे नुकतेच आईएएएफ 20 वर्षाखालील जागतिक एथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. यामध्ये 18 वर्षीय भारतीय हिमा दासने इतिहास घडविला.
हिमाने महिलांच्या 400 मीटर अंतिम शर्यतीत अव्वल स्थान पटकावत सुवर्ण पदक जिंकले. तिने ही शर्यत 51.46 सेकंदात पूर्ण केली होती.
हिमा दासच्या या कामगिरीनंतर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी बुधवारी (18 जुलै), हिमाची आसामच्या क्रीडा राजदूत पदी निवड केल्याचे जाहिर केले आहे.
त्याचबरोबर आसामच्या महिलांनी हिमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्याचे अवाहन केले.
महत्त्वाच्या बातम्या-
-बीसीसीआयच्या वेबसाइटवर एमएस धोनीच आहे टीम इंडियाच्या कर्णधारपदी कायम!
-म्हणून अर्जुन तेंडुलकरला पाहुन झाली सचिनच्या वनडे पदार्पणाची आठवण