लंडन | सर्बियाच्या नोव्हक जोकोविचने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हीन अॅंडरसनला पराभूत करत विंबल्डन ओपन २०१८ च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
दोन तास १८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात नोव्हाक जोकोविचने केव्हीन अँडरसनचा धुव्वा उडवला.
A fourth #Wimbledon title: sealed ✅
The moment @DjokerNole would have dreamed of… #TakeOnHistory pic.twitter.com/czu3QgrdHr
— Wimbledon (@Wimbledon) July 15, 2018
रविवारी (१५ जुलै) झालेल्या विंबल्डन ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोविचने केव्हीन अँडरसनला ६-२, ६-२, ७-६ अशी सरळ सेटमध्ये मात दिली.
या विजयाबरोबरच जोकोविचचे हे ४ थे विंबल्डन तर १३ वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद ठरले.
Reacquainting with an old friend… 🏆#Wimbledon #TakeOnHistory pic.twitter.com/2xMVX5X951
— Wimbledon (@Wimbledon) July 15, 2018
उपांत्य फेरीत जोकोविचने ५ तास १५ मिनिटे चाललेल्या सामन्यात क्ले कोर्टचा किंग राफेल नदालला ६-४, ३-६, ७-६, ३-६, १०-८ अशा फरकाने पराभूत केले होते.
केव्हीन अँडरसनने विंबल्डन इतिहासातील दुसरा सर्वात जास्त वेळ चाललेल्या सामन्यात जॉन इसनरला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.
केव्हीन अँडरसन वि. जॉन इसनर यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना ६ तास ३६ मिनिटे चालला होता.
नोव्हाक जोकोविचचे पुरुष एकेरीतील ग्रॅन्डंस्लॅम विजेतेपदे-
ऑस्ट्रेलियन ओपन – २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६
फ्रेंच ओपन – २०१६
विंबल्डन – २०११, २०१४, २०१५, २०१८
यूएस ओपन – २०११, २०१५
महत्त्वाच्या बातम्या-
-एक फूटबाॅलर ते विश्व विजेती- जाणुन घ्या हिमा दासचा थक्क करणारा प्रवास
-म्हणुन धोनी आहेत जगातील सर्वात हुशार क्रिकेटर…