2018 विंम्बलडन स्पर्धेच्या मंगळवारी ( 3 जुलै) ऑस्ट्रेलियचा निक किग्रीओस आणि झालेल्या सामन्यात उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिन यांच्या पहिल्या फेरीचा सामना झाला.
या सामन्यात निक किग्रीओसने 7-6(3) 7-6(4) 6-7(5) 6-3 अशा फरकाने डेनिस इस्तोमिनचा पराभव केला.
टेनिसचा बॅड बॉय म्हणुन ओळखला जाणारा वादाग्रस्त किग्रिओसने जरी कोणत्याही वादात अडकायचे नाही असे ठरविले तरी वाद त्याच्याकडे चालून येतात.
कालच्या सामन्यात असाच एक प्रकार किग्रिओसकडून अनवधानाने घडला.
यामध्ये सर्विस करणाऱ्या किग्रिओसने मारलेला एक शॉट 217 कि.मी ताशी वेगाने मैदानावरील बॉल गर्लच्या हाताला लागला.
त्यानंतर वेदनेने विव्हणाऱ्या त्या बॉल गर्लकडे जात किग्रिओसने तीची माफी मागितली.
https://twitter.com/NextWaveSurf/status/1014799042218479616
महत्त्वाच्या बातम्या-
-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं…
-मेस्सी-रोनाल्डो वाद पुन्हा पेटला; दापंत्याने घेतला घटस्फोट