---Advertisement---

भारताची धावपटू द्युती चंदचा आनंद द्विगुणित, खेलरत्न पुरस्काराच्या नामांकनानंतर मिळालं ऑलिंपिकचं तिकीट

---Advertisement---

संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यंदा जपानच्या टोकियो शहरात पार पडणार आहे. या स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्यासाठी खेळाडू कसून सराव करत आहेत. अशातच भारताची वेगवान धावपटू द्युती चंद हीदेखील टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. विश्व रँकिंगमध्ये तिने बुधवारी (३० जून) हा कोटा गाठला आहे. ज्यामध्ये १०० मीटरसाठी २२ आणि २०० मीटरसाठी १२ जागा उपलब्ध होत्या. ती जागतिक क्रमवारीत १०० मीटरमध्ये ४४ व्या स्थानावर आहे तर २०० मीटरमध्ये ५१ व्या स्थानावर आहे.

यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटीक्स स्पर्धेत तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. ज्यामुळे ती ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यास अपयशी ठरली होती. परंतु गेल्या आठवडयात तिने महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ११.१७ सेकंदात शर्यत पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता आणि ०.०२ सेकंदाने ती पात्र ठरण्यास अपयशी ठरली होती. (Sprinter dutee chand qualify for Tokyo Olympics)

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

ऑलिम्पिक खेळण्यासाठी निवड होण्याच्या एक दिवसापूर्वी तिला ओडिशा सरकारने गोड बातमी दिली होती. तिची देश पातळीवरील सर्वोच्च पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. द्युती चंदसह ओडिशा सरकारने आणखी ५ खेळाडूंची शिफारस केली आहे. द्युती चंदने ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले आहेत. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “खेळ रत्न पुरस्कारासाठी माझे नाव सुचवल्याबद्दल मी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे आभार मानते. तुमचा आशीर्वाद असाच राहूद्या.”

द्युती चंदला गेल्यावर्षी अर्जुन पुरस्कार मिळाला होता. ओडिशा सरकारने टोकियो ऑलिम्पिकसाठी जात असलेल्या भारतीय हॉकी संघातील सदस्य, बिरेंद्र लाकडा याचे नाव अर्जुन पुरस्कारसाठी, हॉकी संघाचे प्रशिक्षक कालू चरन यांचे नाव द्रोणाचार्य पुरस्कारसाठी आणि माजी वेगवान धावपटू अनुराधा बिस्वाल हिचे नाव ध्यानचंद पुरस्कारासाठी पाठवले आहे.

महत्वाच्या बातम्या-

झुलन गोस्वामीचा नवा पराक्रम! वनडे क्रिकेटमध्ये ‘हा’ विश्वविक्रम करणारी ठरली जगातली पहिलीच महिला क्रिकेटपटू

गंभीर दुखापतीमुळे शुबमन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, ‘या’ क्रिकेटरला मिळणार तिकीट!

शेफालीच्या बचावाने सर्वांना आणली धोनीची आठवण, पण विकेट गेल्यानंतर पेटला ‘नवा वाद’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---