क्रिकेट वेस्ट इंडिजच्या निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी १४ सदस्यांच्या वेस्ट इंडिज संघाची आज घोषणा केली. याचबरोबर ११ जणांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे.
कोरोनानंतर क्रिकेट बंद झाल्यानंतर एखाद्या मालिकेसाठी संघ जाहीर करणारा वेस्ट इंडिज पहिला संघ ठरला आहे.
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ मंगळवारी जाणार असून पहिला कसोटी सामना ८ जुलैपासून होणार आहे. तब्बल १ महिना वेस्ट इंडिज संघ इंग्लंडमध्ये राहणार असून मग पहिला सामना खेळणार आहे.
दौऱ्यावर जाण्यापुर्वी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची कोविड चाचणी होणार आहे.
या संघातली सर्व सदस्यांना बायो सेक्युअर वातावरणात ट्रेन करण्यात येणार असून यात त्यांची सर्व वैद्यकिय काळजी घेण्यात येणार आहे.
ज्या ११ राखीव खेळाडूंची या मालिकेसाठी निवड केली आहे. ते देखील इंग्लंडला जाणार असून सराव तसेच गरजेप्रमाणे ते संघातील खेळाडूंना पर्याय म्हणून उपलब्ध असतील.
Breaking: Squad and Reserves named for Sandals West Indies Tour of England.
Read: https://t.co/mwjrBZSeYp pic.twitter.com/nckok2XulU
— Windies Cricket (@windiescricket) June 3, 2020
डॅरेन ब्रावो, शिमरन हेटमेअर व किमो पाॅलने इंग्लंडला जाण्यास नकार दिला असून त्यांच्या निर्णयाचा वेस्ट इंडिज बोर्डाने पुर्ण आदर केला आहे. त्यांच्या या निर्णयाचा पुढील कोणत्याही मालिकांत निवड होताना परिणाम होणार नाही.
इंग्लंड दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ-
जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकउड, न्कृमा बाॅनर, क्रेग ब्रेथवेट, शमर ब्रुक्स, जाॅन कॅंप्बेल, रोस्टन चेस, रखीम कोर्नोवेल, शेन डाॅवरीच, चेमर होल्डर, शाई होप, अल्झारी जोसेफ, रेमन रायफर, किमार रोच
इंग्लंड दौऱ्यासाठी ११ राखीव खेळाडूंची फळी-
सुनिल अँब्रिस, ज्योशुआ डिसिल्वा, शॅनन ग्रॅब्रिल, किऑन हर्डिंग, काईल मायर्स, प्रेस्टोन मॅकस्विन, मॅर्कुनो मिंडले, शेन मोसेली, अँडरसन फिलिप्स, ओसेन थाॅमस, जोमेल वॅरिकॅन