क्रिकेटविश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सध्या बंद असलेला भारतीय क्रिकेट हंगाम आयपीएलच्या आयोजनानंतर सुरू होईल. तत्पूर्वी बीसीसीआयने भारताच्या कनिष्ठ संघाची निवडसमिती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचे अध्यक्षपद दक्षिण विभागाकडे असल्याने तमिळनाडूचा एक माजी कर्णधार हे अध्यक्षपद भूषवू शकतो.
ही समिती होणार बरखास्त
सध्या कार्यरत असलेल्या कनिष्ठ भारतीय क्रिकेट संघाच्या निवडसमितीचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. सध्या या समितीचे अध्यक्ष असलेल्या आशिष कपूर (दक्षिण विभाग) यांचा तसेच, ज्ञानेन्द्र पांडे (मध्य विभाग) व अमित शर्मा (उत्तर विभाग) यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून, पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या देवाशिष मोहंती यांना वरिष्ठ संघाच्या निवड समितीचे सदस्य म्हणून संधी मिळाली आहे.
नव्या समितीत असेल यांचा समावेश
बीसीसीआयच्या एका अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले, “नव्या कनिष्ठ निवडसमितीची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र, त्यासाठीची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. तमिळनाडूचा माजी कर्णधार श्रीधरन शरथ दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व करत अध्यक्षपद भूषवेल. तो देशांतर्गत क्रिकेटमधील मोठे नाव आहे. त्याच्या जोडीला पंजाबचा माजी खेळाडू क्रिशन मोहन उत्तर विभागाचे, हरविंदरसिंग मध्य विभागाचे तर, रनदेब बोस पूर्व विभागाचे प्रतिनिधीत्व करतील.”
पश्चिम विभागाच्या राकेश पारीख यांना आणखी एक कार्यकाळ या समितीमध्ये देण्यात येईल. नव्या निवड समितीपुढे आगामी एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकासाठी सर्वोत्तम संघ निवडण्याचे आव्हान असेल.
अशी राहिली आहे शरथ यांची कारकीर्द
तमिळनाडूचा माजी कर्णधार राहिलेला श्रीधरन शरथ देशांतर्गत क्रिकेटमधील मोठे नाव आहे. तमिळनाडूसाठी सर्वप्रथम १०० रणजी सामने खेळण्याची कामगिरी त्याने केली होती. आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीत १३९ सामने खेळताना त्याने ८७०० धावा बनविल्या होत्या. त्याच काळात भारतीय संघात राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण व सौरव गांगुली हे फलंदाज असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
“ऑरेंज कॅप सर्वात निरर्थक पुरस्कार”, दिग्गज भारतीय खेळाडूचे मोठे विधान
‘पाऊस आला नसता तर आम्ही भारताच्या नऊच्या नऊ विकेट घेतल्या असत्या,’ कर्णधार रूटची प्रतिक्रिया
धोनीमुळे माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले; ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे वक्तव्य






