---Advertisement---

श्रीसंतचे बडेबोल! म्हणतोय, “मी असतो तर भारताने चार वर्ल्डकप जिंकले असते”

On: मंगळवार, जुलै 19, 2022 5:04 PM
sreeshant
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत हा सातत्याने काही वक्तव्य करून चर्चेत असतो. यावर्षीच निवृत्ती घेतलेल्या श्रीसंतने पुन्हा एकदा असेच वक्तव्य केले आहे. आपण संघात असतो तर विराट कोहलीने चार आयसीसी ट्रॉफी जिंकल्या असत्या असे त्याचे म्हणणे आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

काय म्हणाला श्रीसंत

भारताच्या दोन विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राहिलेला श्रीसंत २०१३ आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सापडल्याने सात वर्षांसाठी निलंबित झाला होता. त्याने २०१९ मध्ये मैदानावर पुनरागमन केले. मात्र, तो भारतीय संघात पुन्हा जाऊ शकला नाही. त्यामुळे यावर्षीच्या रणजी ट्रॉफी दरम्यानच त्याने निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर तो सातत्याने काही वादग्रस्त विधाने करत असतो. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला, ‌‌

“मी विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाचा भाग असतो तर आपण २०१५, २०१९ आणि २०२१ असे तीन विश्वचषक जिंकलो असतो.” स्वतः श्रीसंत २००७ टी२० विश्वचषक व २०११ वनडे विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचा सदस्य राहिला आहे. २०११ विश्वचषकाची आठवण सांगताना श्रीसंत म्हणाला, “आम्ही तो विश्वचषक सचिन पाजींसाठी खेळलो आणि त्यांच्यासाठीच जिंकलो.”

भारतीय संघाला येते अपयश

भारतीय संघ द्विपक्षीय मालिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असला तरी, आयसीसी स्पर्धांमध्ये संघाला अपयश येत आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने अखेरच्या वेळी २०१३ चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली. त्यानंतर भारतीय संघाने २०१५ व २०१९ वनडे विश्वचषक, २०१६ व २०२१ टी२० विश्वचषक, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी व वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळली. त्यापैकी चॅम्पियन्स ट्रॉफी व टेस्ट चॅम्पियनशिपच्यि अंतिम फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला. विराट कोहली कर्णधार म्हणून या काळात एकही ट्रॉफी जिंकू शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

पुजाराने रचला इतिहास! इंग्रजांच्या भूमीवरच करतोय काउंटी संघाचे नेतृत्व 

युवकांना संधी, कसोटीवर लक्ष, भावूक संदेश देत बेन स्टोक्सची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा 

इंग्लंड दौऱ्यातील पाच पराक्रम, जे टीम इंडियाला बनवतील टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---