fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भज्जी पाजीवर बंदी येऊ नये म्हणून मी हातापाया पडलो, त्यांच्यासमोर अक्षरश: रडलो

मुंबई । फिरकीपटू हरभजन सिंग याच्यासाठी 2008  हे वर्ष खूप विवादास्पद ठरले. यावर्षी ऑस्ट्रेलियाचा अँड्रू सायमंड्स यांच्यासोबत झालेल्या मंकीगेट प्रकरण आणि त्यानंतर तत्कालीन भारतीय संघातला खेळाडू श्रीसंत याच्या श्रीमुखात लगावली. ही दोन्ही प्रकरणे क्रिकेट जगतात चांगलीच गाजली.

त्यावर्षी  हरभजन सिंग हा मुंबई इंडियन्स तर एस श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाकडून आयपीएलमध्ये खेळत होता. मोहाली येथील पीसीए मैदानावर मुंबई आणि पंजाब या संघात सामना झाला होता. यात पंजाबने विजय मिळवला.

या सामन्याच्या वेळी एस श्रीसंतने हरभजन सिंगची मस्करी करू लागला. तापट स्वभावाच्या हरभजन सिंगला राग अनावर झाला आणि त्याने श्रीसंतच्या श्रीमुखात लगावली.  त्यानंतर श्रीसंत भर मैदानात जोरजोराने रडू लागला. हरभजनने श्रीसंतला चापट का मारली?याचा खुलासा नुकतेच श्रीसंतने केला आहे.

‘पंजाब मुंबईला हरवणार, पंजाब मुंबईला हरवणार’ असे म्हणूत श्रीसंत हरभजन सिंगला चिडवू लागला. त्यानंतर हरभजनने रागाने श्रीसंतला जोरात चापट मारली.

बीसीसीआयने हे प्रकरण गंभीर घेत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुधींद्र नानावटी समितीची नियुक्ती केली. या समितीसमोर श्रीसंत हरभजन सिंगला कोणतीच शिक्षा करू नका असे सांगत होता. तो समितीच्या समोरही रडत हातापाया देखील पडू लागला.

श्रीसंत क्रिकेट एडिक्टरशी बोलताना म्हणाला, “त्याच दिवशी सचिन पाजीने समजूत काढली. आम्ही दोघे एकाच संघात खेळत असल्याची जाणीवही करून दिली. त्यानंतर मी सचिन तेंडुलकर यांच्या सांगण्यावरून हरभजन सिंगला भेटण्यासाठी गेलो. रात्री आम्ही एकत्र बसून भोजन देखील केले. पण, प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण वाढवले.”

“शेवटी हे प्रकरण बीसीसीआयने नियुक्त केलेल्या समितीच्या समोर आले. या समितीच्या समोर मी हरभजन सिंगवर कोणतीही कारवाई न करण्याची भीक मागत होतो. रडत होतो. तो एक मॅचविनर खेळाडू आहे. त्याच्यावर कारवाई करू नये त्याने भारतासाठी हॅट्ट्रिक देखील घेतली आहे. मी तर क्रिकेटला आता सुरुवात केली आहे. आम्ही दोघे मिळून भारताला विजय मिळवून देण्यासाठी एकत्र खेळू. मी त्याला माझा मोठा भाऊ मानतो,” असे समितीसमोर श्रीसंतने सांगितले.

“या प्रकरणातला एक व्हिडिओ देखील नानावटी आयोगाकडे आहे. मला माहित नाही तो व्हिडिओ आपणाला देतील की नाही. आपण त्यांच्याकडून घेऊ शकता,” असेही तो म्हणाला.

“हरभजन सिंग हा माझ्या मोठ्या भावासारखा आहे. ही घटना घडली आणि त्याला सहन करणे मुश्किल होते. त्याने अनेकदा सार्वजनिक ठिकाणी जाहीरपणे माझी माफी देखील मागितली,” असेही श्रीसंत पुढे म्हणाला.

You might also like