---Advertisement---

सचिन सोबतची आठवण सांगताना श्रीसंत चक्क ढसाढसा रडला

On: मंगळवार, ऑक्टोबर 16, 2018 8:00 PM
---Advertisement---

वादग्रस्त क्रिकेटपटू श्रीसंतने सचिनची आदरयुक्त प्रशंसा केली आहे. सध्या बिग बाॅस सिझन 12 मध्ये श्रीसंतने सहभाग घेतला आहे. सोमवारी (15 आॅक्टोबर) सचिन विषयी आपल्या भावना व्यक्त करताना श्रीसंतला चक्क रडू कोसळले.

“2011 साली विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर 1 ते 2 वर्षांनी एका मुलाखतीमध्ये सचिनने सगळ्या खेळाडूंचे नाव घेत त्यांनी चांगली कामगिरी केली असे म्हटले होते. सचिनने त्यात माझ्या नावाचा उल्लेखही केला नव्हता. मुलाखत जेव्हा शेवटच्या टप्प्यात आली तेव्हा सचिनने श्रीसंतनेही चांगली कामगिरी केल्याचा उल्लेख केला होता. त्यावेळी मला खुप रडू आले होते.” असे श्रीसंतने त्याचा बिग बाॅसमधील सहकारी अनुप जलोटाला सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाने श्रीसंतची काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची विनंती फेटाळली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने श्रीसंतसह इतर खेळाडूंची आयपीएल स्पाॅट फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान दिले होते.
सुप्रीम कोर्टाने  त्यावरील सुनावणी जुलैपर्यंत पुर्ण करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले होते.
मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा आणि एएम खानविलकर यांनी श्रीसंतची बाजू समजून घेतली आहे. मात्र उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला होता.
दिल्ली पोलिसांनी श्रीसंत, अजित चंडेला आणि अंकीत चव्हान या तिघांना स्पाॅट फिक्सिंग प्रकरणात 2013 मध्ये अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment