सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आयपीएल २०२२मध्ये धुमाकूळ घालत आहे. बुधवारी (दि. २७ एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात त्याने एकट्याने ५ विकेट्स घेतल्या. यामुळे सामना गुजरातने ५ विकेट्सने जिकूनही सामनावीराचा पुरस्कार उमरानच्या नावावर झाला. आता या सामन्यानंतर त्याने सांगितले आहे की, त्याला एके दिवशी ताशी १५५ किमीहून अधिक वेगाने गोलंदाजी करायची आहे.
या सामन्यात हैदराबादने (Sunrisers Hyderabad) प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत १९५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने (Gujarat Titans) ५ विकेट्स गमावत शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. मात्र, यादरम्यान गुजरातला ५ विकेट्स गमवावे लागले आणि हे ५ विकेट्स एकट्या उमरान मलिकने (Umran Malik) घेतल्या होत्या. ही आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीपैकी एक आहे.
He may not have ended on a winning side tonight but Umran Malik put on an outstanding display to pick 5⃣ wickets and bagged the Player of the Match award. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/r0x3cGZLvS #TATAIPL #GTvSRH pic.twitter.com/AlOEPvruKx
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2022
मलिक म्हणाला की, “वेगवान गोलंदाजी करणे आणि लेंथ कायम ठेवत विकेट्स घेणे ही योजना होती. जशी मी हार्दिक भावाला बाऊंसर टाकत बाद केले आणि वृद्धिमान साहाला यॉर्करने त्रिफळाचीत केले.”
पुढे बोलताना मलिक म्हणाला की, “मी गोलंदाजीत वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आणि लक्ष फक्त विकेट्स घेण्यावर ठेवले. कारण, हे मैदान लहान आहे.”
प्रश्नावर उमरानचे शानदार उत्तर
उमरानला प्रश्न विचारण्यात आला की, त्याला ताशी १५५ किमीच्या वेगाने गोलंदाजी करायची आहे का? त्यावेळी तो म्हणाला की, “मला फक्त योग्य लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी करून विकेट्स घ्यायच्या आहेत. जिथपर्यंत ताशी १५५ किमी वेगाने गोलंदाजी करण्याची गोष्ट आहे, तर देवाचा आशीर्वाद राहिला, तर मी हे एके दिवशी नक्की करेल.”
त्याला डावाच्या आठव्या षटकात गोलंदाजीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्याने गुजरात संघाची वरची फळी पुरती हालवून टाकली. अशाप्रकारे तो एका डावातील पहिल्या पाच विकेट्स घेणारा आयपीएलमधील पहिला गोलंदाजही बनला.
त्याने यावेळी शुबमन गिलची पहिली विकेट काढली. त्यानंतर हार्दिक पंड्याला तंबूत धाडले. त्यानंतर ताशी १५३ किमीच्या वेगाने यॉर्कर टाकत वृद्धिमान साहाची विकेट घेतल्यानंतर डेविड मिलर आणि त्यानंतर अभिनव मनोहरच्या रूपात पाचवी विकेट घेतली.
उमरानने संपूर्ण सामन्यादरम्यान सातत्याने ताशी १५० किमीहून अधिकच्या वेगाने गोलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १५.९३च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वेगाचे बादशाह! उमरान मलिक ते इशांत शर्मा, जाणून घ्या कोण आहे भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज
गुरू तसा शिष्य! हैदराबाद फलंदाजांच्या दांड्या उडवत उमरान मलिकचे ‘स्टेन’ स्टाईल सेलिब्रेशन
“उमरान मलिकमधील प्रतिभा ‘दुर्लभ’; ब्रेट ली, अख्तर आणि शॉन टेटनंतर फारच कमी पाहायला मिळाला असा वेग”