---Advertisement---

Syed Mushtaq Ali Trophy: SRHच्या खेळाडूने आयुष बदोनीच्या खेळीवर फेरले पाणी, रियान परागचा संघ फायनलमधून बाहेर

Mandeep Singh Abhishek Sharma
---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 चे उपांत्य फेरीचे सामने 4 नोव्हेंबर रोजी खेळले गेले. पहिला उपांत्य सामना दिल्ली आणि पंजाब यांच्यात तर दुसरा उपांत्य सामना बडोदा आणि आसाम यांच्यात झाला. पंजाब आणि बडोदाने हे सामने जिंकले. आयुष बदोनीच्या अर्धशतकाला न जुमानता अभिषेक शर्माने पंजाबसाठी उत्कृष्ट खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून दिला. तर रियान पराग उपांत्य फेरीत फ्लॉप ठरला.

पहिल्या उपांत्य सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 विकेट्स गमावून 183 धावा केल्या. संघाकडून आयुष बदोनीने 57 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी केली. अनुज रावतनेही 34 धावांचे योगदान दिले. कर्णधार यश धुल फ्लॉप ठरला आणि त्याला केवळ 7 धावा करता आल्या. पंजाबकडून सिद्धार्थ कौलने तीन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने 18.4 षटकांत ४ विकेट्स गमावून 184 धावा करून विजय मिळवला. सलामीवीर अभिषेक शर्माने 45 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. तर मनदीप सिंगने अवघ्या 36 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी करत संघाला लक्ष्यापर्यंत पोहचवले.

दुसऱ्या उपांत्य फेरीत आसामचा बडोद्याने 23 चेंडू बाकी असताना 6 गडी राखून पराभव केला. आसामने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सर्वबाद 143 धावा केल्या. ऋषव दासने सर्वाधिक 48 धावांची खेळी खेळली. कर्णधार रियान पराग केवळ 8 धावा करू शकला. बडोद्याकडून अभिमन्यू सिंग राजपूतने चार विकेट्स घेतल्या. बडोद्याने 17व्या षटकातच 146 धावा करून 144 धावांचे लक्ष्य गाठले. संघाकडून निनाद राठवा याने सर्वाधिक 44 धावा केल्या.

आता सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचा अंतिम सामना पंजाब आणि बडोदा यांच्यात 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना मोहालीत खेळवला जाईल. (SRH player turns the tables on Ayush Badoni innings Ryan Parag side out of finals)

म्हत्वाच्या बातम्या

Birthday: 35व्या वयात पदार्पण करणाऱ्या विराटने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!

कोहलीचा विषयच खोल! महिन्याला पितो तब्बल ‘एवढ्या’ रुपयांचं पाणी, आकडा सामन्यांच्या पगारापेक्षा जास्त

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---