आयपीएल 2025 मधील दहावा सामना आज, 30 मार्च, रविवारच्या दिवशी खेळवला जात आहे. आज दोन सामने होणार असून, पहिला सामना दुपारी 3.30 वाजता हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार आहे.
या सामन्यात हैदराबादने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पाहायला मजा येईल, हैदराबाद मोठा स्कोअर उभारणार की दिल्लीचे गोलंदाज त्यांना रोखणार? दोन्ही संघात विस्फोटक फलंदाज असल्.याने सामना रोमांचक होणार हे नक्की आहे.
पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
हैदराबाद- ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
दिल्ली – जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार
दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध विजय मिळवले होते. आता आज दुसऱ्या सामन्यात दिल्ली हैदराबादशी भिडणार आहे. तर दुसरीकडे एसआरएच आपल्या पहिल्या सामन्यात राजस्थानला हरवले होते. तर दुसऱ्या सामन्यात हैदराबादला लखनऊविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.






