---Advertisement---

गुजरातविरुद्ध उमरानला नाही मिळाले अपेक्षित यश, तरीही भाऊची सोशल मीडियावर चर्चा; कारणही तसंच

On: सोमवार, एप्रिल 11, 2022 11:09 PM
umran-malik
---Advertisement---

आयपीएल २०२२ हंगामाच्या २१ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने सामने आहेत. सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक गमावल्यामुळे गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी करावी लागली. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने प्रथम गोलंदाजी केली. हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने या सामन्यात चाहत्यांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित केले.

उमरान मलिक (Umran Malik) हैदराबादचा तोच गोलंदाज आहे, ज्याने मागच्या आयपीएल हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. चालू हंगामात देखील उमरान ही कामगिरी पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरवू शकतो. कारण तो आधीपेक्षा घातक अंदाजासह गोलंदाजी करताना दिसत आहे. गुजरातविरुद्ध सोमवारी (११ एप्रिल) खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने जबरदस्त गोलंदाजी केली आणि चाहते त्याच्या चेंडूचा वेग पाहून हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांकडून उमरानच्या गतीचे कौतुक केले जात आहे.

उमरान मलिकच्या चेंडूचा वेग पाहून चाहते हैराण 

उमरान मलिकने गुजरातविरुद्धच्या या सामन्यात तसे पाहिले, तर काही मोठी कामगिरी केली नाही, पण त्याच्या चेंडूचा वेग पाहून चाहते पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडले आहेत. गुजरातचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू वेड आणि उमरान यांच्यात सामन्यादरम्यान संघर्ष देखील पाहायला मिळाला. शेवटी उमरानने वेडची विकेट घेतली. त्याने सामन्यात टाकलेल्या ४ षटकांमध्ये  ३९ धावा खर्च करून १ विकेट नावावर केली. सोशल मीडियावर उमरानविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसानावर १६२ धावा केल्या. यामध्ये हार्दिक पांड्याने कर्णधारपदाला साजेशी ५० धावांची खेळी केली. हैदराबादसाठी अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच मार्को जान्सेन आणि उमरान मलिकने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

सीएसकेसाठी पहिला विजय बनणार अजूनच अवघड! आरसीबीच्या ताफ्यात घातक गोलंदाजांची झालीय एन्ट्री

संघ मालकीन निता अंबानींपर्यंत गेली बातमी, मुंबईच्या चौथ्या पराभवानंतर खेळाडूंना फोन करत म्हणाल्या…

राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा नायक ठरलेला ‘रीवा एक्सप्रेस’, वडील चालवतात हेअर सलून; वाचा त्याची कहाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---