चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने १० धावांनी जिंकला आहे. या सामन्यात कोलकाताने हैदराबादला १८८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठवाग करताना हैदराबादला ५ बाद १७७ धावाच करता आल्या.
अखेरच्या षटकात ४ षटकांत ५७ धावांची हैदराबादला गरज होती. यावेळी अर्धशतकी खेळी करणाऱ्या मनिष पांडेच्या जोडीला विजय शंकर फलंदाजी करत होता. मात्र, तो १८ व्या षटकांत ७ चेंडूत ११ धावा करुन बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अब्दुल समदने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर २ षटकार मारत हैदराबादच्या विजयाच्या आशा जागवल्या होत्या.
मात्र, शेवटच्या षटकांत समद आणि पांडेला २२ धावा करता आल्या नाही. त्यामुळे अखेर हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. समद ८ चेंडूत १९ धावांवर आणि पांडे ४४ चेंडूत ६१ धावांवर नाबाद राहिला.
कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर शाकिब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसलने प्रत्येकी १ विकेट घेतली.
बेअरस्टो, पांडेने हैदराबादला सावरले
हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र वॉर्नरला दुसऱ्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने ३ धावांवर आणि साहाला तिसऱ्या षटकात ७ धावांवर शाकिब अल हसनने त्रिफळाचीत केले. पण यानंतर बेअरस्टो आणि मनिष पांडेने डाव सांभाळत ९२ धावांची भागीदारी केली. यादरम्यान बेअरस्टोने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले.
ही भागीदारी १३ व्या षटकांत पॅट कमिन्सने तोडली. त्याने बेअरस्टोला ५५ धावांवर बाद केले. त्याने ही खेळी ४० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह केली. पण त्यानंतरही मनिषला मोहम्मद नबीने साथ दिली. नबी १४ धावांवर बाद झाला. पण एका बाजूने मनिष चांगल्या लयीत खेळत होता.
हैदराबादने १६ षटकांत ४ बाद १३१ धावा केल्या.
कोलकाताचे हैदराबादला १८८ धावांचे आव्हान
या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकाताना प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. या आमंत्रणाचा स्विकार करत कोलकाताने २० षटकांत ६ बाद १८७ धावा केल्या आहेत आणि हैदराबादला १८८ धावांचे आव्हान दिले.
मधली फळी कोलमडली
कोलकाताने नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीच्या आक्रमक अर्धशतकामुळे १६ षटकांतच १५० धावांचा टप्पा पार केला होता. मात्र, अखेरच्या काही षटकांत कोलकाताची मधली फळी कोलमडली. आंद्रे रसल १७ व्या षटकांत राशिद खानच्या गोलंदाजीवर ५ धावा करुन बाद झाला.
त्याच्या पाठोपाठ १८ व्या षटकात राणा आक्रमक ५६ चेंडूत ८० धावांची खेळी करुन मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गन देखील २ धावा करुन बाद झाला. यानंतर अखेरच्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर शाकिब अल हसनला ३ धावांवर भुवनेश्वर कुमरने बाद केले. पण अखेरच्या काही षटकांत दिनेश कार्तिकने ९ चेंडूत आक्रमक २२ धावांची खेळी करत कोलताला १८० चा टप्पा पार करुन दिला. या खेळीत त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला.
राणा, त्रिपाठीची अर्धशतके
कोलकाताकडून सलामीला शुबमन गिल आणि नितीश राणा आले. या दोघांनीही सुरुवातीपासून चांगला खेळ केला. राणा या सामन्यादरम्यान वेगळ्याच अंदाजात दिसत होता. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ कायम ठेवला. त्याची आणि गिलची अर्धशतकी भागीदारीही झाली. मात्र, ही भागीदारी रंगत असतानाच गिल १५ धावांवर ७ व्या षटकात राशिद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
मात्र, त्यानंतर राहुल त्रिपाठीने राणाला भक्कम साथ देण्यास सुरुवात केली. एकीकडे राणाने आक्रमक खेळत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. तर दुसऱ्या बाजूने त्रिपाठीनेही काही चांगले फटके मारले. तसेच त्यानेही १५ व्या षटकांत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी कोलकाताला १५ षटकांच्या आतच १४० धावांचा टप्पा पार करुन दिला. या दोघांनी १५ व्या षटकापर्यंत नाबाद अर्धशतकी भागीदारीही केली.
मात्र, अखेर १६ व्या षटकांत टी नटराजनने त्रिपाठीला बाज करत मोठी भागीदारी तोडली. त्रिपाठी ५ चौकार आणि २ षटकारांसह २९ चेंडूत ५३ धावा करुन बाद झाला. त्याने राणासह ९३ धावांची भागीदारी केली.
कोलकाताने १६ षटकांत २ बाद १५२ धावा केल्या.
हैदराबादने जिंकली नाणेफेक
या सामन्यातील नाणेफेक सनरायझर्स हैदराबाद संघाने जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मनीष पांडे, विजय शंकर, अब्दुल समद, मोहम्मद नबी, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, संदीप शर्मा.
कोलकाता नाईट रायडर्स – शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, ओएन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.