इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील साखळी फेरीतील शेवटचा सामना मंगळवारी (3 नोव्हेंबर) खेळला जाईल. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होईल. मुंबईने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवल्याने त्यांच्यासाठी हा सामना कदाचित तितका महत्वाचा नसेल.मात्र, हैदराबादला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवावाच लागेल. या सामन्यात हैदराबाद पराभूत झाले तर त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात येणार आहे. या लेखात आपण दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन(अंतिम ११ जणांचे संघ) पाहाणार आहोत.
चौथ्या स्थानासाठी हैदराबाद आणि केकेआर यांच्यात शर्यत
गुंणतालिकेतील अव्वल 4 संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरतात. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स या 3 संघानी याआधीच प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे.आता चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ शर्यतीत कायम आहे.
…तर कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये मिळवेल स्थान
केकेआर 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. हैदराबाद 12 गुणांसह 5 व्या स्थानावर आहे. जर हैदराबादने मुंबईला पराभूत केले, तर त्यांचा नेट रनरेट केकेआरपेक्षा अधिक असेल. त्यामुळे ते चौथ्या स्थानावर येतील. मात्र, त्यांचा या सामन्यात पराभव झाला, तर केकेआर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवेल.
मुंबई इंडियन्सचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
आक्रमक फलंदाज ख्रिस लीनला आज मुंबईकडून सलामीवीर क्विंटन डिकॉकच्या जागी संधी मिळू शकेल. मुंबई डिकॉकला या सामन्यासाठी विश्रांती देऊ शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू हार्दिक पंड्या, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह ट्रेंट बोल्टलाही विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
संभाव्य संघ –
फलंदाज: सूर्यकुमार यादव, ख्रिस लिन, सौरभ तिवारी
यष्टीरक्षक : ईशान किशन,
अष्टपैलू: कायरान पोलार्ड, कृणाल पंड्या, जयंत यादव
गोलंदाज: मिशेल मॅक्लेनेघन, धवल कुलकर्णी, राहुल चाहर, जेम्स पॅटिन्सन
सनरायझर्स हैदराबादचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
मागील दोन सामन्यात हैदराबाद संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली आहे. पण या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत काही बदल होऊ शकतात. जेणेकरुन फलंदाजी आणखी बळकट होईल.
संभाव्य संघ –
फलंदाज: डेविड वॉर्नर, मनीष पांडे, केन विल्यमसन
यष्टीरक्षक : रिद्धिमान साहा
अष्टपैलू: अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, विजय शंकर
गोलंदाज: राशिद खान, टी नटराजन, संदीप शर्मा
महत्त्वाच्या बातम्या –
महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व; असे रंगणार सामने
धोनी आयपीएल २०२१मध्ये करेल ४०० धावा, दिग्गज क्रिकेटपटूने केली भविष्यवाणी
आयपीएल २०२०मध्ये सुपर फ्लॉप ठरलेले ५ खेळाडू, ज्यांना बोली लावताना थरथरतील फ्रंचायझींचे हात
ट्रेंडिंग लेख-
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?