ट्रेंट बोल्टच्या घातक गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या झंझावाती फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. हा एमआयचा सलग चौथा विजय आहे. सनरायझर्स हैदराबादने पहिल्या डावात खेळताना 143 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईने 15.4 षटकांत फक्त 3 विकेट्स गमावून सामना जिंकला. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा विजय आहे. संघाने आता 9 सामन्यांत 5 सामने जिंकले आहेत. एमआयने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या एसआरएचची सुरुवात खूपच खराब झाली. ट्रॅव्हिस हेड 0, अभिषेक शर्मा 08, ईशान किशन 01, नितीश कुमार रेड्डी 02 आणि अनिकेत वर्मा 12 धावा करून बाद झाले. हैदराबादने फक्त 35 धावांत 5 विकेट गमावल्या. त्यानंतर हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर यांनी जबाबदारी सांभाळली आणि संघाचा सन्मान वाचवला. हैदराबादरने पाॅवरप्लेमध्ये विकेट्स गमावल्याने संघ सुरुवातीलाच बॅकफूटला पडला, त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही.
Fairplay or facepalm? 🤯
— Star Sports (@StarSportsIndia) April 23, 2025
Ishan Kishan walks… but UltraEdge says 'not out!' What just happened?!
Watch the LIVE action ➡ https://t.co/sDBWQG63Cl #IPLonJioStar 👉 #SRHvMI | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/bQa3cVY1vG
Boult brings the thunder, Head has no answer!
— Star Sports (@StarSportsIndia) April 23, 2025
MI gets the early breakthrough!
Watch the LIVE action ➡ https://t.co/sDBWQG63Cl #IPLonJioStar 👉 #SRHvMI | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/AqSSoK90vs
तथापि, क्लासेनने 44 चेंडूत 71 धावा केल्या. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या मनोहरने 37 चेंडूत 43 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. या दोघांमुळे हैदराबादचा स्कोअर 140 च्या पुढे जाऊ शकला. मात्र, या विकेटवर या धावा पुरेशा नव्हत्या.
144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली, पण रोहित शर्माने आक्रमक खेळत 46 चेंडूत 70 धावा फटकावल्या. त्याला सूर्याची (नाबाद 40 ) आणि विल जॅक्सची (22) चांगली साथ मिळाली. सलग दुसरं अर्धशतक झळकावणाऱ्या रोहितच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये तिसरं स्थान मिळवलं आहे.