---Advertisement---

अभिषेक शर्मानं हणला आयपीएल 2025 मधील सर्वात लांब षटकार, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने अशा पद्धतीने फलंदाजी केली, जी क्वचितच पाहायला मिळते. त्याने एकट्याने हैदराबादला विजय मिळवून दिला. तो सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आला. त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली फक्त 40 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. त्याने 141 धावांची मोठी खेळी खेळली, संघाच्या विजयात तो सर्वात मोठा हिरो ठरला.

पंजाब किंग्जच्या मार्को जॅन्सेनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध डावातील 10वे षटक टाकले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माने षटकार मारला. यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवरही षटकार मारला. अभिषेकने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला आणि चेंडू 106 मीटर अंतररावर गेला. यासोबत त्याने आयपीएल 2025 मधील सर्वात लांब षटकार मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने 55 चेंडूत 141 धावा केल्या, ज्यात 14 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. त्याच्या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. तो आयपीएलमध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आणि केएल राहुलचा विक्रम मोडला. राहुलची आयपीएलमधील सर्वात मोठी खेळी 132 धावांची होती.

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जच्या संघाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्यात 245 धावा केल्या. अय्यरने 82 धावांची खेळी केली. त्याला सलामीवीर प्रभसिमरन सिंगची चांगली साथ मिळाली, ज्याने 42 धावा केल्या. प्रियांश आर्यने 36 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी स्फोटक फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने त्यांच्या विजयाचा पाया रचला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---