इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी (18 मे) इतिहास घडला. विराट कोहली याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतक ठोकले. अवघ्या 62 चेंडूत विराटने हा कारनामा केला. हैदराबादच्या राजी गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना केळला गेला. विराटच्या आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे शतक ठरले.
आरसीबीला या सामन्यात विजायासाठी सनरायझर्स हैदराबादकडून 187 धावांचे लक्ष्य मिळाले. आरसीबीचा सलामीवीर जोडी विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 172 धावंची भागीदारी साकारली. विरानटे आयपीएल 2019 नंतर आपले पहिले आयपीएल शतक हैदराबादविरुद्ध केले. पण शतकानंतर पुढच्याच चेंडूवर भूवनेश्वर कुमारने त्याला झेलबाद केले. 18व्या षटकातील 5व्या चेंडूवर विराट ग्लेन फिलिप्सच्या हातात झेलबाद झाला.
असे असले तरी, आरसीबीने हा सामना 19.2 षटकांमध्ये दोन विकेट्सच्या नुकसानावर जिंकला. विराटने या सामन्यात एकूण 63 चेंडू खेळले आणि बाद झाला. त्याला साथ मिळाली आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याची. फाफने 47 चेंडूत 71 धावांचे योगदान दिले. विराटच्या डावात 12 चोकार आणि 4 षटकार होते, तर फाफने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. ग्लेन मॅक्सवेल 5* आणि मायकल ब्रेसवेल 4 धावा करून शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम होते.
तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबातने निर्धारित 20 षटकांमध्ये 5 बाद 186 धावा केल्या होत्या. नाणेफेक गमावल्यामुळे हैदराबादला प्रथम फलंदाजी करावी लागली. हेनरिक क्लासेन याने 49 चेंडूत शतक ठोकले. मात्र, त्याची ही खेळी हैदराबादच्या कामी आली नाही. विराट कोहलीच्या झंजावातापुढे क्लासनेचे शतक व्यर्थ ठरले. क्सासेनने एकूण 51 चेंडू खेळले आणि 104 धावा करून बाद झाला. (srh vs rcb 6th IPL century OF Virat Kohli)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वतःशीस स्पर्धा करतोय फाफ डू प्लेसिस! हंगामात 650 धावा पूर्ण, नावावर केला नवा विक्रम
‘सगळ्यांकडून शिकायचं आहे, पण अनुकरण नाही’, लखनऊचा कर्णधार कृणालची प्रतिक्रिया चर्चेत