आयपीएल 2024 मधील 41 वा सामना काल (दि. 25 एप्रिल) हैद्राबादेतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात हंगामातील फॉर्ममध्ये असलेला संघ सनरायझर्स हैदराबाद आणि विजयाच्या शोधात असलेला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने होते. ज्यात आरसीबीने सनरायझर्स हैदराबादवर मात करत 35 धावांनी विजय साकारला आणि सलग दोन पराभवांच्या हॅटट्रीक नंतर मोसमातील दुसरा विजय मिळवला.
यंदाच्या हंगामातील आरसीबीचा हा दुसरा विजय असला तरीही स्पर्धेतील त्यांचे आव्हान जवळपास संपल्याचे दिसतंय. सनरायझर्स हैदराबादचा हा हंगामातील तिसरा पराभव ठरला आहे. आरसीबीने बरोबर एका महिन्यानंतर यंदाच्या स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने विराट-रजतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 206 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र त्याच्या प्रत्युत्तरात हैदराबाद संघाला फक्त 171 धावाच करता आल्या. हैद्राबातचे सर्व मातब्बर फलंदाज बाद होत राहिल्याने हैद्राबादचा पराभव झाला. ( SRH vs RCB Highlights IPL 2024 RCB win only their second game of the season beat SRH by 35 runs )
Rajat Patidar bags the Player of the Match Award for his swift half-century 🏆
Scorecard ▶️ https://t.co/2EpEyR3PF2#TATAIPL | #SRHvRCB pic.twitter.com/FcH5jOkHYK
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2024