---Advertisement---

SRH vs RR: सॅमसन-जुरेल झटपाट बाद, या ठिकाणीच सामना फिरला??

---Advertisement---

आयपीएल 2025च्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात हैदराबादने राजस्थानवर आपली ताकद लादली, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाने फलंदाजीचा सुरुवातीला तुफानी जलवा दाखवत 20 षटकांत तब्बल 286 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ संघर्षपूर्ण खेळ करत 242 धावांपर्यंत मजल मारू शकला. अखेर, हैदराबादने हा रोमांचक सामना 44 धावांनी जिंकत आपल्या विजययात्रेची दमदार सुरुवात केली.

पहिल्या डावात खेळताना खेळताना हैदाबादने ईशान किशनच्या (107) शतकी तर ट्रॅव्हिस हेडच्या (67)अर्धशतकी खेळीच्या जोरावर 286 धावांचा डोंगर उभा केला. राजस्थानकडून गोलंदाजीत सिमरजीत सिंग आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

मोठा लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाला दुसऱ्याच षटकात 2 धक्के बसले, यशस्वी जयस्वाल (1) रियान पराग (04) स्वस्तात बाद झाले, त्यानंतर तिसऱ्या क्रमाकावर आलेल्या नितीश राणाने देखील निराशा केली. तो 11 धावा करुन बाद झाला. यांंनतर संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी संघाला सावरले आणि झटपट धावा चोरल्या दोघांनी 111 धावांची भागीदारी रचली.

50-3 अश्या स्थितीतून दोघांनी राजस्थानच्या धावसंख्येवरुन 161 धावापर्यंत नेले, मात्र 14व्या षटकात संजू सॅमसनच्या रुपाने चाैथा बसला. संजूची हीच विकेट सामन्याचा टर्निंग पाॅइंट ठरला, कारण त्याच्या पाठोपाठ ध्रुव जुरेलही दुसऱ्याच षटकात बाद झाला. संजू सॅमसनने 37 चेंडूत 66 धावा केल्या तर जुरेलने 35 चेंडूत 70 धावा केल्या. यानंतर शिमरॉन हेटमायर (42 धावा) आणि शुभम दुबे (34 धावा) यांनी आक्रमक फलंदाजी केली पण ते संघाला विजय मिळवून दिऊ शकले नाही.

हैदराबादकडून गोलंदाजीत हर्षल पटेल आणि सिमरजीत सिंग यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. आशाप्रकारे हैदराबादने 44 धावांनी विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---