---Advertisement---

IPL 2018: अंतिम सामन्यात कोण प्रवेश करणार हैद्राबाद की कोलकाता ?

On: शुक्रवार, मे 25, 2018 5:55 PM
---Advertisement---

कोलकाता। आयपीएल 2018 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स अाणि सनरायजर्स हैद्राबाद हे क्वालिफायर 2 साठी अामने-सामने येत आहे.

हैद्राबाद मागचे चारही सामने हरला असून त्यांना आजच्या सामन्यात चांगलीच मेहनत करावी लागणार आहे.

त्यांनी पहिल्या 10 पैकी 8 सामने जिंकले होते. तसेच सलग सहा सामने जिंकून प्लेअॉफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला होता. मात्र त्यांना क्वालिफायर 1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत व्हावे लागले.

Image: अल्फा प्रेडिक्शन

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोलकाताचा संघांची सध्याची कमगिरी हैद्राबादच्या विरूध्द आहे. त्यांनी लागोपाठ चार सामने जिंकले अाहेत. तसेच एलिमिनेटरमध्ये त्यांनी राजस्थान रॉयल्सला पराभूत केले. या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहानेला बाद करून कोलकाताला विजयाचा मार्ग गवसला.

या दोन्ही संघाचे कर्णधार या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या दहामध्ये आहेत. केन विलियमसन 685 धावा करून पहिल्या तर दिनेश कर्तिक 490 धावा आठव्या स्थानावर आहे.

या दोन्ही संघातील कॅरेबियन अष्टपैलू खेळाडूंनी महत्वाच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. हैद्राबादकडून कार्लोस ब्रेथवेटने चेन्नई विरोधात 29 चेंडूत 43 धावा तर कोलकाताच्या आंद्रे रसेलने राजस्थान विरोधात 25 चेंडूत 49 धावा केल्या होत्या.

Image: अल्फा प्रेडिक्शन

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हैद्राबादचा अनुभवी गोलंदाज भुनवेश्वर कुमारने 10 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. मागे कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात त्याने 26 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या.

राशिद खानने अनेक चांगल्या फंलदाजांना बाद केले आहे. त्याने 15 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र त्याला कोलकाता विरूध्दच्या दोन्ही सामन्यात विकेट्स मिळवता आले नाही.

स्पीनर कुलदिप यादव, सुनिल नारायन आणि पियुष चावला हे कोलकाताच्या गोलंदाजीचे मुख्य दुवे आहेत. या मोसमात तिघांनी मिळून 43 विकेट्स घेतले आहेत.

हैद्राबाद आणि कोलकाता या दोन्ही संघाच्या गोलंदाजीनी तसेच फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.

चेन्नई विरूध्द अंतिम सामन्यात कोण भिडणार हे आज स्पष्ट होईल.

कधी होईल आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना?
कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा क्वालिफायर 2चा सामना आज 25 मेला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील सामना?
कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील आजचा सामन ईडन गार्डन क्रिकेट स्टेडियम, कोलकाता येथे होईल.

Image: अल्फा प्रेडिक्शन

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना?
आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना आज रात्री 7.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री 6.30 वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद  सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

सनरायजर्स हैद्राबाद: केन विल्यमसन ( कर्णधार ), शिखर धवन, वृद्धीमान साहा, मनिष पांडे, शाकिब अल हसन, दिपक हुडा,भुवनेश्वर कुमार, युसुफ पठाण,राशिद खान, सिध्दार्थ कौल, ख्रिस जॉर्डन, तन्मय अग्रवाल, खलिल अहमद, बसिल थम्पी, रिकी भुई, बिपूल शर्मा, कार्लोस ब्रेथवेट, श्रीवत्स गोस्वामी, अलेक्स हेल्स, मेहेदी हसन, मोहम्मद नबी, टी नटराजन, सचिन बेबी, संदिप शर्मा, बिली स्टानलेक

कोलकाता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक (कर्णधार),रॉबीन उथप्पा, आंद्रे रसेल, ख्रिस लीन, पियुष चावला, कुलदिप यादव, मिशेल जॉन्सन, सुनिल नारायन, शुभम गील, इशांक जग्गी, नितीश राणा, विनय कुमार, अपुर्व वानखाडे, रिंकू सिंग, शिवम मवी, जॅवोन सर्लस, कॅमरॉन डेलपोर्ट, टॉम कुरान, प्रसिध कृष्णा

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment