---Advertisement---

श्रीलंका संघात या दोन खेळाडूंचे झाले एक वर्षांनंतर पुनरागमन

---Advertisement---

श्रीलंका क्रिकेटने पुढील महिन्यात होणाऱ्या 15 ते 30 डिसेंबर दरम्यानच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी 17 जणांचा संघ घोषित केला आहे. यावेळी लाहिरू थिरीमाने आणि विकेटकिपर सदीरा समरविक्रमा हे दोघे तब्बल एक वर्षानंतर संघात पुनरागमन करत आहेत.

दिनेश चांदीमलच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघ खेळणार आहे. तर तो ही संघात परत येत असून नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी दुखापतीमुळे तो दोन सामने खेळला नव्हता.

नुवान प्रदिपचे या मालिकेतून संघात परतत आहे. तो मागील वर्षी भारत विरुद्धच्या कसोटी मालिकेवेळी दुखपातीमुळे संघाबाहेर गेला होता.

तसेच युवा गोलंदाज लाहिरू कुमाराचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने 12 कसोटी सामन्यात 22 डावांमध्ये 40 विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंड दौऱ्यात श्रीलंका 2 कसोटी, 3 वन-डे आणि एकमेव टी20 सामना खेळणार आहे.

15 डिसेंबरला खेळला जाणारा पहिला कसोटी सामना वेलिंग्टनला तर दुसरी कसोटी 26 डिसेंबरला ख्रिस्टचर्चला होणार आहे.

श्रीलंकेचा संघ- दिनेश चंदिमल (कर्णधार), दिमुथ करूणारत्ने, कुशल मेंडिस, धंनजया डिसिल्वा, अॅंजेलो मॅथ्यूज, रोशेन सिल्वा, निरोशन डिकवेला, धनुषा गुणातिलका, लाहिरू थिरीमाने, सदीरा समरविक्रमा, दिलरूवान परेरा, लक्षण संदकन, सुरंगा लकमल, नुवान प्रदिप, कसुन रजिथा, लाहिरू कुमारा, दुष्मंथा चामिरा

महत्त्वाच्या बातम्या:

तोच महिना, तोच सामना, ठिकाणही तेच; टीम इंडियाबरोबर घडला विचित्र योगायोग

विराटला शत्रू नव्हे, मित्र बनवा; हा अजब सल्ला दिला आहे आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने

Video: रशीद खानच्या धोनी स्टाईलने विरेंद्र सेहवाग झाला अचंबित

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment