जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी (दि. 24 फेब्रुवारी) न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. श्रीलंका बोर्डाने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. दिमुथ करुणारत्ने याच्या नेतृत्वात श्रीलंका संघ 9 मार्चपासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची ठरणार आहे. खरं तर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांव्यतिरिक्त फक्त श्रीलंका असा संघ उरला आहे, जो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत अजूनही कायम आहे. श्रीलंकेने ही मालिका 2-0ने जिंकली, तर त्यांचे अंतिम सामन्यात पोहोचण्याची आशा वाढेल.
श्रीलंका क्रिकेटने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “श्रीलंका क्रिकेट निवड समितीने 2023 श्रीलंका दौऱ्यासाठी 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घेण्यासाठी 17 सदस्यीय कसोटी संघाची निवड केली आहे.”
17-member Sri Lanka Test squad announced for New Zealand Tour 2023. #NZvSL pic.twitter.com/yC8QSCGSJq
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 24, 2023
मात्र, श्रीलंका संघाची आकडेवारी न्यूझीलंडमध्ये खास राहिली नाहीये. आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये खेळण्यात आलेल्या 19 सामन्यात संघाला फक्त 2वेळाच विजय मिळवता आला आहे.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
श्रीलंका संघ 9 मार्च ते 8 एप्रिल असा न्यूझीलंड दौरा करणार आहे. यादरम्यान श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड (Sri Lanka vs New Zealand) संघात 2 कसोटींव्यतिरिक्त 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिकाही खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 ते 13 मार्चदरम्यान ख्राईस्टचर्च येथे खेळला जाईल. तसेच, दुसरा कसोटी सामना वेलिंग्टन येथे 17 मार्च ते 21 मार्चदरम्यान खेळला जाईल.
श्रीलंका कसोटी संघ
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), ओशादा फर्नांडो, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, निरोशन डिकवेला, निशान मदुष्का, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, चमिका करुणारत्ने, कसुन रजिता, लाहिरू कुमारा, असिता फर्नांडो, विश्वा फर्नांडो आणि मिलन रत्नायके.
ऑस्ट्रेलिया होऊ शकतो बाहेर
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 (Border-Gavaskar Trophy 2023)मध्ये ऑस्ट्रेलिया सध्या 0-2ने पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाला या मालिकेत 0-4ने पराभवाचा सामना करावा लागला, तर त्यांचे संकट वाढू शकते. कारण, क्लीन स्वीप झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत 60 टक्के गुण राहितील. अशात, श्रीलंकासाठी पहिल्यांदा अंतिम सामन्यात पोहोचण्याचे दरवाजे खुले होतील. श्रीलंकेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अखेरची कसोटी मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळायची आहे. (sri lanka announce 17 member test squad for tour of new zealand important series for wtc final read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल किमतीपेक्षा महाग विकला गेला TNPL मधील खेळाडू, पाच सामन्यांतच केलेले स्वतःला सिद्ध
रोहितच्या लग्नात विराटने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसोबत धरला होता ठेका, जुना व्हिडिओ तुफान व्हायरल