टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) या स्पर्धेची सुरुवात होण्यासाठी केवळ 1 महिन्याचा कालावधी उरला आहे. ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषकाचे सामने खेळले जाणार आहेत. अशात सर्व सहभागी संघ त्यांच्या सर्वोत्कृष्ट 15 खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात व्यस्त आहेत. भारतासहीत सुपर-12 मध्ये सहभागी 8 पैकी 7 संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. तर शुक्रवारी (16 सप्टेंबर) आशिया चषकाचा चॅम्पियन श्रीलंकेने टी20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला आहे.
श्रीलंकेने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. दासुन शनाका (Dasun Shanaka) याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच संघामध्ये 8 ऑक्टोबरपर्यंत बदल करण्याची मुभा आहे. तर श्रीलंकेने पाच खेळाडू राखीवमध्ये ठेवले आहेत. या स्पर्धेत श्रीलंकेला पहिल्या टप्प्यात खेळायचे आहे. यामध्ये त्यांच्यापासूनच स्पर्धेला सुरूवात होणार आहे. कारण 16 ऑक्टोबरला त्यांचा सामना नामिबियाशी होणार आहे. या पहिल्या टप्प्यात ते सर्वाधिक सामने जिंकले तेव्हा त्यांचा समावेश सुपर 12मध्ये होणार आहे.
श्रीलंकेमध्ये आशिया चषकात खेळलेल्यांपैकी सर्वाधिक खेळाडू टी20 विश्वचषकात आहेत. त्यापैकी लाहिरू कुमारा आणि दुष्मंथा चमीरा यांना संघात घेतले आहे, मात्र त्यांच्या फिटनेसवरून ते खेळणार की नाही हे निश्चित होणार आहे. तर आशिया चषकात खेळणाऱ्या एका खेळाडूला वगळण्यात आले आहे. तो आहे मथीषा पथिराणा, त्याने आशिया चषकातच पदार्पण केले होते.
दिनेश चंडीमल याने आशिया चषकामधून टी20 संघात पुनरागमन केले, मात्र त्याला राखीव खेळाडूंमध्ये जागा देण्यात आली आहे. तसेच दिलशान मदुशंका याने युएईमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला टी20 विश्वचषकासाठी संघात कायम केले आहे.
आशिया चषकामध्ये श्रीलंकेने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्यांनी अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत सहाव्यांदा चषक उंचावला.
टी20 विश्वचषकासाठी श्रीलंका संघ:
दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुनातिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित असालंका, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिश तीक्षाना, जेफ्री वांडर्से, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा (फिटनेसच्या अधीन), लाहिरू कुमारा (फिटनेसच्या अधीन), दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन.
Here's your 🇱🇰 squad for the ICC Men's T20 World Cup! ⬇️#RoaringForGlory #T20WorldCup pic.twitter.com/GU7EIl6zOw
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 16, 2022
राखीव खेळाडू: अशेन बंदारा, प्रवीण जयविक्रमे, दिनेश चंडिमल, बिनुरा फर्नांडो, नुवानिदू फर्नांडो
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 विश्वचषकासाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा! क्रेग इर्विनचे कर्णधाराच्या भूमिकेत पुनरागमन
‘आधी कोहलीच्या लेव्हलचा हो, मग कर्णधार बन’, पाकिस्तानी क्रिकेटरचाच आझमला कटू सल्ला
पंजाब किंग्जला मिळाला विश्वविजेता प्रशिक्षक, आयपीएल ट्रॉफीही केलीये नावावर