आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. या दोन देशांचे खेळाडू अनेकदा मैदानावरच एकमेकांशी भिडले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारत-पाकिस्तान मॅच पेक्षा जास्त ड्रामा दुसऱ्या एका सामन्यात पाहायला मिळतोय, तो म्हणजे श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामना!
2018 च्या निदाहास ट्रॉफी दरम्यानचा नागिन डान्स असो किंवा 2023 एकदिवसीय विश्वचषकादरम्यान अँजेलो मॅथ्यूजचं टाइमआउट बाद होणं, या दोन संघांच्या सामन्यादरम्यान मैदानावरचं तापमान नेहमीच वाढलेलं दिसतं. आता असाच काहीसा प्रकार 6 मार्च रोजी सिल्हेटमध्ये झालेल्या दुसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात घडला. बांगलादेशनं श्रीलंकेविरुद्धचा हा सामना 8 विकेटनं जिंकला आणि तीन सामन्यांची टी 20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. मात्र हा सामना एका वादग्रस्त घटनेमुळे चर्चेत राहिला. (Sri Lanka vs Bangladesh controversy).
झालं असं की, बांगलादेशला विजयासाठी १६६ धावांची गरज असताना बिनुरा फर्नांडोनं चौथ्या षटकातील पहिला चेंडू सौम्य सरकारला टाकला. हा चेंडू त्याच्या बॅटच्या काठाला लागला आणि विकेटकीपरनं पाठीमागे झेल घेतला. यावर बिनुरा आणि श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनी अपील केलं, ज्यानंतर मैदानावरील पंचांनी सौम्य सरकारला आऊट दिलं. परंतु बांगलादेशनं या निर्णयाविरोधात DRS (प्लेअर रिव्ह्यू) घेत तिसऱ्या पंचाकडे अपील केलं.
यानंतर खरा वाद सुरू झाला. व्हिडिओच्या रिप्लेमध्येही अल्ट्रा एजची पुष्टी झाली, मात्र तिसऱ्या पंचांनी सरकारला नाबाद ठरवलं. त्यांनी मैदानावरील पंचांना त्यांचा निर्णय बदलण्याचं आवाहन केलं. तिसऱ्या पंचांनी सौम्य सरकारला नॉट आउट देताच या निर्णयावर श्रीलंकेच्या खेळाडूंचा विश्वासच बसत नव्हता. रिप्लेमध्ये बॅटला चेंडू स्पष्ट चाटून गेल्याचं दिसत होतं, तरीही तिसऱ्या पंचानी नॉटआऊट दिलं. यावर श्रीलंकेच्या खेळाडूंनी मैदानावरील पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र मैदानावरील पंचांकडे हा निर्णय बदलण्याचे अधिकार नसल्यानं सौम्य सरकारला जीवनदान मिळालं.
DRAMA! Clear noise > on-field umpire signals out > review taken > 3rd umpire rules not out despite UltraEdge!
Bangladesh-Sri Lanka always throws up a controversy 😶
.
.#BANvsSL #FanCode pic.twitter.com/8hH9i65SD6— FanCode (@FanCode) March 6, 2024
सौम्य सरकार मात्र या जीवनदानाचा फायदा उठवू शकला नाही आणि तो मथिशा पाथिरानाच्या गोलंदाजीवर 26 धावांवर बाद झाला. मात्र तोपर्यंत त्यानं लिटन दाससोबत पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली होती. या भागिदारीच्या बळावर बांगलादेशनं हा सामना आठ विकेटनं जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! क्रिकेटच्या देवाची विकेट Bigg Boss विजेत्या मुनवर फारुकीनं घेतली! पाहा Video
धरमशाला कसोटीत युवा फलंदाजाचं पदार्पण, 24 वर्ष जुना विक्रम मोडला
‘त्यानं कदाचित ऋषभ पंतला खेळताना पाहिलं नसेल’, इंग्लिश फलंदाजाच्या कमेंटवर रोहितचं चोख प्रत्युत्तर