सलामीवीर पथुम निसांकाच्या नाबाद 127 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने लंडनच्या केनिंग्टन ओव्हल येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा आठ विकेट्स राखून पराभव केला. हा विजय पाहुण्या श्रीलंकेसाठी सर्वार्थाने खास राहिला. तब्बल एका दशकानंतर श्रीलंकेला इंग्लंडमध्ये कसोटी सामन जिंकता आला आहे. मात्र, श्रीलंकेच्या विजयानंतरही इंग्लंड संघाने तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली.
पहिल्या डावात ऑली पोपच्या 154 धावांच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने 325 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 263 धावांवरच गुंडाळला गेला होता. परिणामी इंग्लंडने 62 धावांची आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात लाहिरू कुमाराच्या चार विकेट्स आणि विश्वा फर्नांडोच्या तीन विकेट्सच्या जोरावर श्रीलंकेने इंग्लंडचा दुसरा डाव 156 धावांत गुंडाळला होता. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य मिळाले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने दिमुथ करुणारत्नेची विकेट लवकरच गमावली. तो 8 धावांवर बाद झाला होता. यानंतर निसांकाने कुसल मेंडिससह डाव पुढे नेला, मात्र 39 धावांवर गस ऍटकिन्सनने मेंडिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर निसांकाला साथ देण्यासाठी अँजेलो मॅथ्यूज आला आणि दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी 111 धावांची नाबाद भागीदारी केली आणि श्रीलंकेला सामना जिंकून दिला. निसांकाने 124 चेंडूंच्या खेळीत 13 चौकार आणि दोन षटकार ठोकले, तर मॅथ्यूज 32 धावा करून नाबाद परतला.
First Test win for Sri Lanka in England in more than a decade 🙌#WTC25 | #ENGvSL 📝: https://t.co/5vNSEM3dMg pic.twitter.com/yxMesmtiIS
— ICC (@ICC) September 9, 2024
परदेशात 200 हून अधिक धावांचे लक्ष्य तिसऱ्यांदा गाठले
अशाप्रकारे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेने इंग्लंडवर सोपा विजय मिळवला. यासह सलग 6 विजयानंतंर घरच्या मैदानावरील इंग्लंडची विजयी मोहीम थांबली. अशाप्रकारे श्रीलंकेने तिसऱ्यांदा परदेशी भूमीवर कसोटी सामन्यात 200 हून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले आहे. परदेशात गाठलेले हे त्यांचे तिसरे सर्वोच्च लक्ष्य आहे. 2019 मध्ये डरबनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेने सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यावेळी संघाने 304 धावांचा यशस्वी पाठिंबा करुन दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते.
याशिवाय श्रीलंकेने इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामना जिंकण्याची ही केवळ चौथी वेळ आहे. याआधी श्रीलंकेने 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध अखेरचा विजय मिळवला होता. त्यावेळी लीड्समध्ये खेळलेला सामना श्रीलंकेने 100 धावांनी जिंकला होता.
हेही वाचा-
सुरक्षा घेरा तोडून आझमला भेटायला पोहोचला चाहता, त्यानंतर रौफने असे काही करत जिंकली मनं
कोहली किंवा जो रूट नाही तर ‘हा’ बनेल कसोटीतील सर्वकालीन महान खेळाडू, गांगुलीची भविष्यवाणी
उपकर्णधारापासून ‘द वॉल’पर्यंत, या दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद!