आशिया चषक 2022 चे विजेते पद भूषवणाऱ्या श्रींलेकेला यावर्षी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आशिया चषकाच्या सुरवातीच्या आधिच श्रीलंका संघाती दिग्गज खेळाडूंना दुखापत झाल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. या जखमी खेळाडूंमध्ये प्रमुख फिरकीपटू वानिंदू हसरंगा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा आणि दिलशान मधुशंका यांचा समावेश आहे. दुखापतीने त्रस्त असलेल्या आपल्या खेळाडूंबाबत श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने मोठी गोष्ट सांगितली आहे.
गुरुवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शनाकाने खंत व्यक्त केली, तो म्हणाला की, “आम्ही दुखापतींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. हसरंगा, चमीरा हे दुर्दैवाने मुकलेले खेळाडू तुम्हाला माहीत आहेत. ते मोठे आणि अनुभवी खेळाडू आहे. पण आमच्याकडे युवा खेळाडूंचा संघ आहे आणि त्यांच्यासाठी हा एक चांगला अनुभव असेल आणि आम्ही या स्पर्धेसाठी उत्सुक आहोत.”
पुढे तो श्रीलंकेचा कर्णधार म्हणाला की, “2022 च्या आशिया चषकात देखील आम्ही या स्पर्धेत एक काळी बाजू म्हणून आलो होतो आणि आमचा पहिला सामना अफगाणिस्तानकडून हरलो होतो पण तरीही ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झालो. या क्षणी आम्ही कुठे उभे आहोत आणि आमच्या संघाचा समतोल यात काही प्रश्न नाही. आम्ही फक्त स्पर्धेची वाट पाहत आहोत” असेही तो म्हणाला.
आशिया चषकातील दुसरा सामना
आशिया चषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळ संघाला 238 धावांनी पराभूत केले आहे. यात पाकिस्तानचा कर्णघार बाबर आझम याने 131 चेंडूत 151 धावांची खेळी करत संघाच्या धावात भर घातली. आता या स्पर्धेतील दुसरा सामना श्रीलंकाविरुद्ध बांगलादेश असा होणार आहे. भारतीय वेळेनुसार गुरवारी दुपारी 2 वाजता हा सामना चालू होईल.
दरम्यान श्रीलंकेचे दिग्गज खेळाडू संघात नसल्यामुळे ते कशा प्रकारे संघाला विजयी मिळवून देण्यासठी लढतात हे पाहणे मनोरंजक असणार आहे. (sri lanka captain dasun shanaka says about his team player injuerd)
महत्वाच्या बातम्या-
तुफानी अर्धशतकाचे टीम डेव्हिडला बक्षिस! ऑस्ट्रेलिया निवडसमितीचा मोठा निर्णय
BREAKING: सचिनच्या घराबाहेर प्रहार संघटनेचे तीव्र आंदोलन, आमदार बच्चू कडू स्वतः सहभागी, वाचा संपूर्ण प्रकरण