गतवर्षी जगभरात थैमान घालणारा कोरोना (कोविड १९) हा आजार नव्या वर्षातही पाठ सोडायला तयार नाही. क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावर अनेक बंधने घातल्यानंतर क्रीडाविश्व नव्याने सुरू होत असतानाच क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. श्रीलंका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर व अनुभवी फलंदाज लाहिरू थिरीमन्ने यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
श्रीलंका संघाचे सुरू आहे सराव शिबिर
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी श्रीलंका संघाचे सराव शिबिर २८ जानेवारीपासून सुरू आहे. एकूण ३६ खेळाडू व प्रशिक्षक या शिबिरात सहभागी झाले आहेत. या शिबिरात सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंची व प्रशिक्षकांची नियमितपणे कोरुना चाचणी घेण्यात येते. नुकत्याच झालेल्या चाचणीत मात्र संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर व अनुभवी फलंदाज लाहिरू थिरीमन्ने यांचे अहवाल सकारात्मक आले.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर केले पत्रक
त्यानंतर, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘आर्थर व थिरीमन्ने यांची मंगळवारी (२ फेब्रुवारी) झालेली कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यामुळे लगोलग या दोघांनाही श्रीलंका सरकारने ठरवलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमावली अनुसार विलगीकरणात पाठवण्यात आले.’
Sri Lanka coach Mickey Arthur and batsman Lahiru Thirimanne have tested positive for Covid-19.
We wish them a speedy recovery 🙏 pic.twitter.com/jbUnexonRe
— ICC (@ICC) February 3, 2021
दौऱ्यामध्ये होऊ शकतो बदल
मुख्य प्रशिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नियोजित दौऱ्यात काहीसा बदल होऊ शकतो. या दौऱ्याला २० फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. श्रीलंका संघ या दौऱ्यामध्ये तीन वनडे, तीन टी२० व दोन कसोटी सामने खेळेल. सध्या वेस्ट इंडिज संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे.
महत्वाच्या बातम्या:
कदाचित भारत ३-० किंवा ४-० फरकाने इंग्लंडला पराभूत करेल, इंग्लंडच्या दिग्गजाची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारताचा विजय अतुलनीय! पाहा कोणी केलंय कौतुक
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंग कोहलीची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ