श्रीलंका क्रिकेट संघाचे व्यवस्थापक अशंता द मेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे त्यांच्या संघाला सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात अयोग्य खेळपट्टी दिल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर त्यांनी सरावासाठीही योग्य सुविधा मिळत नसल्याचे सांगितले आहे.
इएसपीएल क्रिकेइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार अशंता म्हणाले, ‘आम्ही आत्तापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात आम्हाला आम्हाला आढळले की कार्डीफ आणि ब्रिस्टोलमध्ये आम्ही गवत असलेल्या खेळपट्टीवर खेळलो. याच ठिकाणी अन्य संघ तपकिरी आणि फलंदाजीसाठी पोषक अशा खेळपट्टीवर खेळले.’
‘शनिवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या आमच्या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवरही गवत आहे. ही द्राक्षे आंबट आहेत म्हणून आम्ही तक्रार करत नाही. पण आयसीसीकडून हे खूप चूकीचे होत आहे, काही संघांसाठी वेगळी खेळपट्टी आणि अन्य संघांसाठी वेगळी खेळपट्टी.’
तसेच सरावासाठी देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल अशंता म्हणाले, ‘कार्डीफमध्ये सरावासाठी देण्यात आलेल्या सुविधाही असमाधानकारक होत्या. तीन नेटच्या ऐवजी आम्हाला दोनच नेट देण्यात आल्या होत्या.’
‘तसेच ब्रिस्टोलमध्ये आम्हाला जे हॉटेल दिले होते, त्यामध्ये स्विमिंगपूलची सुविधा नव्हती, जी कोणत्याही संघासाठी महत्त्वाची असते. विशेषत: सरावानंतर वेगवान गोलंदाजांना त्यांच्या स्नायूंना आराम देण्यासाठी.’
‘ब्रिस्टोलमध्येच पाकिस्तान आणि बांगलादेशला स्विमिंगपूल असणाऱ्या हॉटेल देण्यात आले होते. आम्ही चार दिवसांपूर्वी आयसीसीला या सर्व गोष्टीबद्दल लिहीले होते. पण आम्हाला त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. पण आम्ही जोपर्यंत उत्तर येत नाही तो पर्यंत त्यांना लिहित राहणार आहोत.’
आयसीसीने मात्र श्रीलंकेने केलेले आरोप फेटाळताना म्हटले आहे की स्पर्धेतील खेळपट्टीवर स्वतंत्र सल्लागाराची नजर आहे.
श्रीलंकेने या विश्वचषकात आत्तापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांमधील त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. तर त्यांना न्यूझीलंड विरुद्ध पराभव स्विकाराला लागला आहे आणि अफगाणिस्तान विरुद्ध त्यांनी विजय मिळवला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी मास्टर ब्लास्टरने टीम इंडियाला दिला खास सल्ला
–विराट कोहलीच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहून शिकतोय पाकिस्तानचा हा फलंदाज
–तूम्ही धोनीचे मोठे फॅन असाल तर इथे मिळेल मोफत जेवण!