टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत श्रीलंका संघाचा फलंदाज दनुष्का गुणथिलका हा मोठ्या अडचणीत सापडला. त्याच्यावर ऑस्ट्रेलियामध्ये एका महिलेवर लैंगिक अत्या’चार केल्याचा आरोप आहे. यामुळे श्रीलंका क्रिकेटने त्याच्यावर कारवाई करत त्याला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळण्यास बंदी आणली. त्याला अटक करण्यात आली असून श्रीलंका संघ त्याच्याशिवाय मायदेशी परतला आहे. मात्र, आता असे वृत्त आहे की, श्रीलंका क्रिकेटने म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियात दनुष्काच्या कायदेशीर बचावासाठीचा खर्च उचलणार आहेत.
कथित घटनेच्या सहा दिवसंनंतर श्रीलंका क्रिकेटने म्हटले आहे की, याचा शोध घ्यायचा आहे की, ज्या रात्री दनुष्का गुणथिलका (Danushka Gunathilaka) आरोपाशी संबंधित होता, त्या बुधवारी (दि. 02 नोव्हेंबर) त्याने कर्फ्यू मोडला की नाही.
श्रीलंका क्रिकेटला गुणथिलकाच्या बचावासाठी मदत करण्याचे कोणत्याही कराराचे बंधन नाही. खरं तर, ते स्वेच्छेने हे सर्व करत आहेत. डी सिल्वा यांनी जोर देत म्हटले की, ते अखेरीस कायदेशीर खर्च वसूल करतील. एक तर गुणथिलका याला बोर्डाला पैसे परत देण्यास सांगून किंवा बोर्डाने त्यांचा पगार कापून.
डी सिल्वा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “हा वैयक्तिक दौरा नव्हता. तो अधिकृतरीत्या संघासोबत होता. त्यामुळे आम्हाला वाटले की, आम्ही कायदेशीर शुल्क भरले पाहिजे. हे फक्त अटीवर की, नंतर निकाल काहीही लागो, आम्ही नंतर त्याच्याकडून हे सर्व परत घेऊ. त्याचे आई-वडील कायदेशीर शुल्क भरण्याच्या स्थितीत नाहीयेत.”
गुणथिलकाबद्दल थोडक्यात
गुणथिलका 2017पासून श्रीलंका संघाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग आहे. त्याने श्रीलंकेकडून 8 कसोटी, 47 वनडे आणि 46 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. गुणथिलकाला सिडनी पोलिसांनी अटक केली होती आणि त्याच्यावर संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याचे चार आरोप (Danushka Gunathilaka Accused of Rape) लावले होते. त्यानंतर जामीनासाठीही नकार दिला होता. (sri lanka cricket bear Danushka Gunathilaka’s legal fees read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहितची मोठी हिंट! सांगूनच टाकलं, पंत अन् कार्तिकपैकी इंग्लंडविरुद्ध कोणाला उतरवणार
टी20 क्रमवारीत सूर्या अव्वल स्थानावर कायम! केएल राहुल आणि अर्शदीप सिंगला फायदा, विराट 11व्या स्थानावर