अलिकडच्या काळात क्रिकेटमध्ये (cricket) दिवसेंदिवस सुधारणा होताना पाहायला मिळत आहेत. युवा क्रिकेटपटूंनी खेळाची एक वेगळीच पातळी गाठली आहे. खेळाडूंच्या फिटनेसला आता क्रिकेटमध्ये पहिल्यापेक्षा खूपच जास्त महत्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता श्रीलंका क्रिकेट बोर्डने (Srilanka Cricket Board) महत्वाचा निर्णय घेतला आहे. बोर्डने श्रीलंका संघातील क्रिकेटपटूंसमोर फिटनेसचे नवीन आव्हान ठेवले आहे. आता श्रीलंका संघातील खेळाडूंना यो-यो फिटनेस टेस्ट (yo-yo fitness test) पार करावी लागणार आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डने घेतलेल्या निर्णयानुसार जे खेळाडू या फिटनेस टेस्ट पास होणार नाहीत, त्यांच्या वेतनामधील काही भाग कापला जाणार आहे. या फिटनेस टेस्टमध्ये खेळाडूंना २ किलोमीटर धावायचे आहे. जे खेळाडू हे दोन किलोमीटरचे अंतर ८.१० मिनिटात पार करतील त्यांची संघात निवड केली जाऊ शकते आणि त्यांना आर्थिक नुकसानही होणार नाही. तर दुसरीकडे जे खेळाडू हे अंतर कापण्यासाठी ८.५५ पेक्षा अधिक वेळ घेतील त्यांची संघात निवड केली जाणार नाही.
बोर्डच्या नियमांप्रमाणे ज्या खेळाडूंना हे २ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ८.३५ ते ८.५५ मिनिटे लागतील, त्यांना मिळणाऱ्या वेतनापैकी काही भाग बोर्ड कापून घेणार आहे आणि हे खेळाडूं संघात समील होऊ शकतात. श्रीलंकेच्या खेळाडूंची पहिली यो-यो फिटनेस टेस्ट ७ जानेवारीला असेल आणि यामध्ये संघात सामील असलेले सर्व खेळाडू सहभाग घेतील. त्याव्यतिरिक्त महिन्यात कधीही खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेतली जाऊ शकते.
दरम्यान, श्रीलंका संघाचा माजी दिग्गज फलंदाज माहेला जयवर्धने (Mahela Jayawadene) मागच्या काही दिवसांपूर्वी श्रीलंका संघासोबत सल्लागाराच्या रूपात जोडला गेला आहे. जयवर्धने आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक आहे आणि त्याच्या मार्गदर्शना संघाने चांगली कामगिरी केली आहे. अशात जयवर्धने मुंबई फ्रेंचायाझीप्रमाणेच श्रीलंका संघातही काही महत्वपूर्ण बदल करू इच्छित असेल आणि याची सुरुवात झालेली दिसत आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डने जो निर्णय आता घेतला आहे, ती यो-यो फिटनेस टेस्ट भारतीय संघात खूप आधीपासून घेतली जात आहे. एमएस धोनी ज्यावेळी संघाचे नेतृत्व करत होता. त्या काळात पहिल्यांदा ही टेस्ट घेतली गेली होती. त्यानंतर विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघाने फिटनेसबाबतीत वेगळीच उंची गाठली आहे. सध्याच्या भारतीय संघातील युवा खेळाडू फिटनेसच्या बाबतीत खूप पुढे आहेत, असे दिसते.
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियासाठी २०२१ मध्ये २५ खेळाडूंचे पदार्पण; ‘हा’ डाव्या हाताचा गोलंदाज राहिला चर्चेत
विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ ८ संघांनी मिळवली क्वार्टर फायनलमध्ये जागा, पाहा कसे आहे बाद फेरीचे वेळापत्रक