पुढील महिन्यात इंग्लंड संघ श्रीलंका दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील वनडे आणि कसोटी मालिकांसाठी श्रीलंकाने त्यांचे संघ जाहिर केले आहेत. पण या वनडे संघात माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला मात्र स्थान देण्यात आलेले नाही. या निर्णयासाठी श्रीलंका निवड समितीने त्याच्या फिटनेसचे कारण दिले आहे.
त्याच्या ऐवजी श्रीलंकेच्या वनडे संघात सदिरा समराविक्रमाला संधी देण्यात आली आहे. तसेच कुसल मेंडिसलाही त्याच्या मागील काही महिन्यांपासून झालेल्या खराब कामगिरीमुळे वनडे संघातून वगळण्यात आले आहे.
मॅथ्यूजने सध्या संयुक्त अरब अमिरातीत सुरु असलेल्या एशिया कप स्पर्धेत श्रीलंकेचे नेतृत्व केले आहे. पण श्रीलंकेचे या स्पर्धेत साखळी फेरीत अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध झालेल्या पराभवामुळे आव्हान संपुष्टात आले.
त्यामुळे त्याला कर्णधारपद सोडण्यास सांगण्यात आले आणि एशिया कपमधून दुखापतीमुळे बाहेर असलेल्या दिनेश चंडिमलला श्रीलंकेचा कर्णधार करण्यात आले.
मॅथ्यूजची नजीकच्या काळात चांगली कामगिरी झाली होती. मागील 12 महिन्यात त्याने 11 सामन्यात 66.85 च्या सरासरीने 468 धावा केल्या आहेत. तसेच एशिया कप आधी पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतही त्याने श्रीलंकेकडून सर्वाधिक 235 धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर मॅथ्यूजला आणि कुसल मेंडिसला कसोटी संघात मात्र स्थान देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर 16 जणांच्या कसोटी संघात कुसल डिसिल्वा, मलिंडा पुष्पाकुमारला यांना संधी देण्यात आली आहे.
तसेच कसोटी संघात लहिरु कुमाराचाही समावेश जरी करण्यात आला असला तरी त्याच्या फिटनेसमुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे आहे.
असा इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ-
दिनेश चंडिमल (कर्णधार), उपुल थारंगा, सदिरा समरविक्रमा, निरोशन डिकवेल्ला (यष्टीरक्षक), धनंजय डि सिल्वा, थिसारा परेरा, अकिला धनंजया, दुशमंथा चमिरा, लसिथ मलिंगा, अमिला अपोन्सो, लक्षण संदकान, नुवान प्रदीप, कसुन रजिथा, कुसल परेरा.
असा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ-
दिनेश चंडिमल (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, कौशल सिल्वा, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डि सिल्वा, रोशन सिल्वा, दिलरुवन परेरा, रंगना हेराथ, मालिंडा पुष्पकुमार, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, कसुन राजिथा, लक्षण संदकान, निरोशन डिकवेल्ला (यष्टीरक्षक).
महत्त्वाच्या बातम्या-
–केएल राहुल म्हणाला, मी ती गोष्ट करायला नको होती…
–भारत-अफगाणिस्तान सामना टाय झाल्यानंतर रडणाऱ्या चिमुकल्या चाहत्याला भुवनेश्वर कुमारला दिली खास भेट
–टॉप ५: भारत-अफगाणिस्तानच्या सामन्यात झाले हे खास विक्रम