श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि पेट्रोलियम मंत्री अर्जुना रणतुंगाच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आजच त्यांना कोलंबोच्या गुन्हे शाखा विभागाने अटक केली आहे.
रविवारी (28 ऑक्टोबर) देमातागोडा येथील सेलॉन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (सीपीसी) येथे झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यु तर दोघे जखमी झाले. या प्रकरणात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रणतुंगा यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाण्याची मनाई काही जण करत होते. यावेळी त्यांच्या अंगरक्षकाने गोळी चालवली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यु झाला तर दोघे जखमी झाले.
कोलंबो गुन्हे शाखा विभागाने रणतुंगा यांना अटक करण्यात आली असून त्यांना लवकरच न्यायालयात नेणार आहे, असे रूवान गुनासेकरा या पोलिसाच्या प्रवक्ताने सांगितले.
शुक्रवारी (19 ऑक्टोबर) श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी मंहिदा राजपक्षे यांना पंतप्रधानाची शपथ दिली. तेव्हापासूनच त्यांनी संसद सत्र बंद ठेवले.
तसेच राजपक्षे यांनी ट्रेड यूनियनशी जोडलेल्या सभासदांचा प्रवेश मंत्रालयात निषिद्ध केला होता. याच कारणावरून रणतुंगा त्यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश नाकारला. यावेळीच ही घटना घडली.
तसेच रणतुंगावर विमानात काम करणाऱ्या भारतीय कर्मचारी महिलेने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप ७: मुंबईकर रोहित शर्माने मुंबईतच केले हे खास विक्रम
–२४७१ खेळाडूंना न जमलेली गोष्ट हिटमॅन रोहित शर्माने करुन दाखवली