आता दासून शनाका टी20 फॉरमॅटमध्ये श्रीलंका संघाचा कर्णधार असणार नाही. कारण, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दासून शनाका याला कर्णधार पदावरून हटवलं आहे. आता टी20 फॉरमॅटमध्ये दशून शनाकाच्या जागी वानिंदू हसरंगा याला कर्णधार बनवण्यात आले आहे. तर, वनडे फॉरमॅटमध्ये कुसल मेंडिस श्रीलंका संघाचा कर्णधार असेल. याशिवाय चरित असलंका दोन्ही फॉरमॅटमध्ये उपकर्णधाराची भूमिका बजावेल. लंका प्रीमियर लीगमध्ये वानिंदू हसरंगा जखमी झाला होता. यानंतर वानिंदू हसरंगा मैदानापासून दूर होता, मात्र आता हसरंगा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. याआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठे फेरबदल केले आहेत. या मालिकेतील पहिला सामना 6 जानेवारीला होणार आहे. अलीकडेच विश्वचषकादरम्यान दासून शनाका (Dasun Shanaka) याला दुखापत झाली होती. त्यानंतर कुसल मेंडिस (Kusal Mendis) याला कर्णधार बनवण्यात आले. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने 9 सामने खेळले, ज्यात फक्त 2 जिंकले, तर 7 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.
विश्वचषकात श्रीलंका संघाच्या खराब कामगिरीनंतर नवीन निवड समिती स्थापन करण्यात आली. ही निवड समिती माजी क्रिकेटपटू उपुल थरंगा याच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. याशिवाय माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याची ‘क्रिकेट सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सनथ जयसूर्या पुढील 1 वर्षासाठी श्रीलंका क्रिकेटसाठी ‘क्रिकेट सल्लागार’ म्हणून काम करणार आहे. झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना 6 जानेवारी रोजी होणार आहे. दोन्ही संघ कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियमवर आमनेसामने येतील. (Sri Lanka gets two new captains to lead ODI and T20 series against Zimbabwe)
हेही वाचा
IND vs AUS । ऑस्ट्रेलियासाठी वरच्या फळीतील फलंदाजांची अर्धशतके, दीप्ती शर्माचे विकेट्सचे पंचक
धोनीच्या डोळ्यात पाणी पाहिलय? सीएसकेने शेअर केला 9 वर्षांपूर्वीचा फोटो, कारणही वाचा






