भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या घरच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून होणार आहे, जो जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताला मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत आहे. मात्र, या सामन्यापूर्वी प्रोटीज संघाला मोठा धक्का बसला असून वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी केपटाऊनमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. कोएत्झीला पेल्विक इन्फ्लेमेशनचा त्रास झाला आहे आणि त्यामुळे हा वेगवान गोलंदाज मालिकेतील शेवटच्या सामन्यात सहभागी होणार नाही.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार सेंच्युरियनमधील पहिल्या कसोटीदरम्यान गेराल्ड कोएत्झी (Gerald Coetzee) याला सूज आली आणि भारताच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याची अस्वस्थता वाढली. शुक्रवारी (29 डिसेंबर) त्याच्या स्कॅनमध्ये त्याची दुखापत मोठी असल्याचे स्पष्ट झाले.
या सामन्यात उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने भारताच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना 16 षटकांत एक विकेट घेतली होती. तिसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात कोएत्झी केवळ पाच षटके टाकू शकला आणि मैदान सोडले. मात्र, दक्षिण आफ्रिकेला त्याची अनुपस्थिती जाणवली नाही कारण इतर वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले.
दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेने कोएत्झीच्या बदलीची घोषणा केलेली नाही. त्यांच्याकडे संघात वेगवान गोलंदाजीचे पर्याय म्हणून लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) आणि विआन मुल्डर (Vian Mulder) यांचा पर्याय आहे.
केपटाऊन कसोटीतून वबाहेर पडलेला गेराल्ड कोएत्झी हा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. त्याच्याआधी नियमित कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) हाही बाहेर पडला आहे, ज्याला सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली. त्याच्या जागी झुबेर हमजा याचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी कर्णधारपदाची जबाबदारी डीन एल्गर याच्याकडे सोपवण्यात आली आहे, ज्याने पहिल्या सामन्यातही बावुमाच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले होते. (Big blow to South Africa ahead of second Test against India key bowler ruled out due to injury)
हेही वाचा
IND vs SA: पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरलेल्या प्रसिध कृष्णाबद्दल माजी गोलंदाजाचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘तो कसोटी खेळण्याच्या लायक…’
Ms Dhoni Viral Video: एमएस धोनीने चाहत्याला दिला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला, धक्कादायक कारण आले समोर