शुक्रवारी (29 डिसेंबर) मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना संपल्यानंतर मैदानावर एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. येथे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने आपले शूज एका छोट्या क्रिकेट चाहत्याला भेट दिले. आयपीएलच्या या सर्वात महागड्या गोलंदाजाने हे केले कारण त्याने या छोट्या क्रिकेट चाहत्याला वचन दिले होते की, जर सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानच्या सर्व विकेट घेतल्या तर तो त्याला त्याचे शूज भेट देईल.
ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानचा दुसरा डाव गुंडाळला आणि कसोटी सामना जिंकला, तेव्हा मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने लगेचच या तरुण चाहत्याला शूज भेट केले. सर्वप्रथम त्याने आपल्या शूजवर स्वाक्षरी केली आणि नंतर पिवळी टोपी घातलेल्या या छोट्या क्रिकेट चाहत्याला शूज सुपूर्द केले. इतर अनेक तरुण चाहतेही येथे दिसले. स्टार्कने या सर्वांसोबत सेल्फीही काढला.
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव केला. येथे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव 264 धावांवर आटोपला. यानंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 262 धावांत आटोपून विजयाच्या आशा उंचावल्या. येथे 317 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ एकवेळी विजयाच्या जवळ दिसत होता.
At the end of lunch, Mitchell Starc promised this young fan he’d give him his boots if we took nine wickets by the end of the day.
We did, and Starcy delivered on his promise! ❤️ pic.twitter.com/grLhdxcPfm
— Cricket Australia (@CricketAus) December 29, 2023
पाकिस्तानला विजयासाठी फक्त 98 धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात 5 विकेट शिल्लक होत्या. मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) आणि सलमान आगा (Salman Agha) मैदानावर ठामपणे उभे होते. पण रिझवान वादग्रस्तरित्या बाद झाला आणि यानंतर पाकिस्तानचा संघ 237 धावांवर आटोपला. या पराभवामुळे पाकिस्तान आता तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडला आहे. (IPL’s most expensive player keeps his promise gifts shoes to little fan after Melbourne Test Watch the video)
हेही वाचा
भारताच्या पराभवानंतर हरभजन सिंगचे पुजाराबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘त्याचे विराट एवढेच…’
IND vs SA: भारतीय दिग्गजाकडून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाचे कौतुक; म्हणाला, ‘तो रोहितला मागील पाॅकेटमध्ये…’